सनीला कोरोना व्हायरसची भीती, चाहत्यासोबत असं काही केलं की....

जगात सध्या सर्वत्र कोरोना व्हायरस या धोकादायक विषाणू व्हायरसची भीती पसरली आहे.

Updated: Jan 30, 2020, 11:56 AM IST
सनीला कोरोना व्हायरसची भीती, चाहत्यासोबत असं काही केलं की.... title=

मुंबई : जगात सध्या सर्वत्र कोरोना व्हायरस या धोकादायक विषाणू व्हायरसची भीती पसरली आहे. त्यामुळे विमानतळांवर देखील सुरक्षा बाळगण्यात येत आहे. याचदरम्यान अभिनेत्री सनी लियोनीला देखील या धोकादायक व्हायरसची भीती वाटत असल्याचं एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे. सनीचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओमध्ये ती पतीसोबत एअरपोर्टवर दिसून आली होती, तेव्हा सनीची एक चाहती तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी फार उत्सुक होती. पण चाहती सेल्फी घेण्यासाठी जवळ आली आणि त्याच क्षणी लगेचच सनीने तोंडाला मास्क लावला. त्यामुळे सनीच्या चाहतीचा नक्कीच हिरमोड झाला असवा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#CoronaVirusAlert No Selfie Pls SunnyLeone at the airport today #instalove #staysafe #wednesday #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

सनीचा हा व्हिडिओ व्हायरल तर होतच आहे पण नेटकऱ्यांचे कमेंट्स देखील मोठ्या प्रमाणावर येत आहेत. हा व्हिडिओ मानव मंगलानी याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मानव मंगलानी कायम सेलेब्रिटींच नव-नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. 

तर, आता पर्यंत कोरोना व्हायरल मुळे चीनमध्ये एकूण १३६ लोकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय जवळपास ६ हजार लोकांना या विषाणूचा बाधा झाली आहे. चीनमध्ये पसरलेल्या कोरोना (corona virus)  व्हायरसचं सावट सध्या संपूर्ण जगावर आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता या राज्यांच्या विमानतळांवर देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

शिवाय परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी देखील विमानतळांवर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जगभरात खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. भारतातून एकूण ४ संशयित रुग्णांची सॅम्पल तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आली होती. यातले दोन संशयित मुंबईचे तर एक बंगळुरुचा आणि एक हैदराबादचा आहे. 

यातल्या मुंबईच्या दोन्ही रुग्णांचं करोना सॅम्पल निगेटिव्ह आली आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. इतरांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून कस्तुरबा रुग्णालयात वेगळा वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे.