मुंबई : सनी देओलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. सनीच्या चित्रपटाला आणि अभिनेत्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, पण सध्या या अभिनेत्याच्या मुलाला प्रेक्षकांकडून तसं प्रेम मिळत नाहीये. नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला सनी देओलचा मुलगा राजवीर देवळेचा डेब्यू चित्रपट 'दोनों' बॉक्स ऑफिसवर पयशी ठरताना दिसत आहे.
या चित्रपटाचं कलेक्शन अद्याप समोर आलेलं नाही, मात्र स्वत:ला समीक्षक म्हणवणाऱ्या कमाल आर खान यांनी ट्विट करून 'दोनों' सुपर फ्लॉप असल्याचा दावा केला आहे. केआरकेने ट्विट करून लिहिलं आहे की, 'सनी देओलच्या मुलाचा 'दोनों' चित्रपट सुपरफ्लॉप ठरत आहे. या सिनेमाची आत्तापर्यंत शुक्रवारी फक्त 90, शनिवारी फक्त 42 आणि रविवारी फक्त 43 तिकिटे विकली गेली. मला खात्री आहे की, फक्त निर्मात्यांनी ही तिकिटं विकत घेतली असतील. असं ट्विट केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंन्टवर केलं आहे.
या चित्रपटातून केवळ सनी देओलचा मुलगा राजवीरने डेब्यू केला नाही तर पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ढिल्लननेही त्याच्यासोबत इंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध उद्योग दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश एस बडजात्या यांनी केलं आहे. या चित्रपटातून सूरजने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे.
Sunny Deol’s son film #Dono has destroyed, advance booking records of #Pathan and #Jawan at Cinepolis.
For Friday - 90 Tickets
For Saturday- 42 Tickets
For Sunday- 43 Tickets
I am sure, only producers have bought these tickets— KRK (@kamaalrkhan) October 5, 2023
सूरज बडजात्याने फिल्म इंडस्ट्रीला हम आपके है कौन, प्रेम रतन धन पायो, मैने प्यार किया सारखे हिट चित्रपट दिले आहेत, जरी त्याच्या मुलाचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'दोनो' पहिल्या दिवशी एक कोटीही कमावू शकलेला नाही. या सिनेमाचं बजेट 20 करोड असल्याचं बोललं जात आहे.