Virushka Luxury Life : 'विरुष्का' हे भारतातलं हे प्रसिद्ध आणि सेलिब्रिटी नाव. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या नावातले शब्द घेऊन तयार करण्यात आलेलं हे यूनिक नाव. विराट आणि अनुष्का दोघांनीही आपापल्या क्षेत्रात आपल्या कामगिरीची छाप उमटवली असून दोघांचेही लाखो चाहते (Followers) आहेत. विरुष्काची लाईफ स्टाईल, त्यांची फॅशन, त्यांची कामगिरी याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता कायमच त्यांच्या चाहत्यांना असते. पण हे सेलिब्रिटी कपल (Celebrity couple) केवळ आपल्या क्षेत्रातच नाहीत तर कमाईच्या बाबतीतही अव्वल आहेत. इतकंच काय तर विराट आणि अनुष्कामध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे हे जाणून घेण्याचाही चाहते प्रयत्न करत असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कशी आहे त्यांची लाईफस्टाईल (Life Style) आणि किती आहे त्यांची कमाई.
Virat Kohli आहे इतक्या संपत्तीचा मालक
टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीचं (Virat Kohli) नाव जगातली सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये घेतलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार कोहलीची एकूण संपत्ती 127 मिलिअन डॉलर म्हणजे जवळपास 1046 कोटी रुपये इतकी आहे. विराट वर्षाला 15 कोटी रुपयांची कमाई करतो. त्याची महिन्याची कमाई आहे 1 कोटी 25 लाख रुपये, तर आठवड्याला तो 28 लाख 84 हजार 615 रुपये कमतो. म्हणजेच त्याची दिवसाची कमाई आहे 5 लाख 76 हजार 923 रुपये इतकी.
विराट टीम इंडियाचा हुकमी खेळाडू आहे. त्यामुळेच बीसीसीआयच्या करारात त्याचा ग्रेड A+ मध्ये समावेश आहे. करारानुसार बीसीसीआयकडून विराटला वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय कसोटी, एकदिवसीय आणि टी20 फॉर्मेनुसार त्याला प्रत्येक सामन्याचे वेगळे पैसै मिळतात.
जाहीरात आणि गुंतवणूकीतून कमाई
क्रिकेटच्या व्यतिरिक्त जाहीराती आणि सोशल मीडियातूनही विराट करोडोची कमाई करतो. सोशल मीडियावर आपले फोटो वापरण्यासाठीही त्याला पैसे मिळतात. काही कंपन्याचा तो ब्रँड अॅम्बेसेडर आहे, आणि यासाठीचा करार हा काही कोटींमध्ये असतो. याशिवाय विराट कोहलीने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती आहे. त्यातून त्याला चांगला परतावा मिळतो.
विराट सध्या 'मान्यवर, एमपीएल, पेप्सी, फिलिप्स, फास्टट्रैक, बूस्ट, ऑडी, एमआरएफ, हीरो, वॉल्वोलिन, प्यूमा' सारख्या प्रसिद्ध बँडच्या जाहीराती करतो. गुंतवणूकीबद्दल बोलायचं झालं तर विराटने Blue Tribe, Chisel Fitness, Nueva, Galactus Funware Technology Pvt. Ltd, Sport Convo आणि Digit सारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. विराट कोहलीने नुकतंच गायक किशोर कुमार यांचा बंगला भाडेतत्वावर घेतला असून त्यात त्याने शानदार रेस्टोरंट सुरु केलं आहे. या रेस्टोरंटचं नाव 'वन8 कम्यून' असं आहे.
Insta वर मिलिअन चाहते
विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर तब्बल 220 मिलिअन फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत Lionel Messi आणि Cristiano Ronaldo यांच्यानंतर Virat Kohli तिसऱ्या क्रमांकावर आहे. Hooper HQ 2022 इंस्टाग्राम रिच लिस्टमधल्या जगभरातील टॉप 20 व्यक्तींमध्ये अभिनेत्री प्रियंका चोपडानंतर (Priyanka Chopra) विराट कोहली एकमेव भारतीय आहे. विराट कोहली इन्स्टाग्रामवरच्या एका पोस्टसाठी तब्बल 8.9 कोटी रुपये घेतो.
महागड्या कारचं कलेक्शन
क्रिकेटव्यतिरिक्त विराट कोहलीला महागड्या गाड्यांचा छंद आहे. कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये एकाहून एक महागड्या आणि मोठ्या ब्रँडच्या गाड्या आहेत. यात Audi Q7 (70 ते 80 लाख), Audi RS5 (जवळपास 1 कोटी रुपये), Audi R8 LMX (जवळपास 2.97 कोटी रुपये), Audi A8L W12 Quattro (जवळपास 1.98 कोटी रुपये), Land Rover Vogue (जवळपास 2.26 कोटी रुपये) अशा गाड्यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट नुसार विराट कडे Bentley Flying Spur (1.70- 3.41 कोटी रुपये) आणि Bentley Continental GT (3.29-4.04 कोटी रुपये) यांचाही समावेश आहे. पण दोन गाड्यांची नोंदणी त्याच्या भावाच्या नावावर आहे.
अव्वल अभिनेत्रींमध्ये अनुष्काचा समावेश
कमाईच्या बाबतीत अनुष्का शर्माही (Anushka Sharma) विराटपेक्षा कमी नाही. किंग खान शाहरुखबरोबर (Shah Rukh Khan) 'रब ने बना दी जोडी' या सिनेमापासून अनुष्का शर्माने आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात केली. आज अव्वल बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्रींच्या यादीत अनुष्काचं नाव घेतलं जातं. आपल्या फिल्मी कारकिर्दीत अनुष्काने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. सिनेमासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीतही अनुष्का शर्मा टॉपवर आहे.
अनुष्का इतक्या संपत्तीची मालक
अनुष्का शर्मा 35 मिलिअन डॉलर म्हणजे जवळपास 265 कोटी रुपयांची मालकिन आहे. सिनेमांमधून ती करोडो रुपये कमवते. मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का एका सिनेमासाटी 10 कोटी रुपये मानधन घेते. तिची वार्षिक कमाई जवळपास 12 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय जाहीरात आणि सोशल मीडियातूनही तिची चांगली कमाई होते. एका जाहीरातीसाठी अनुष्का जवळपास 4 ते 5 कोटी इतकी घसघशीत रक्कम घेते.
सोशल मीडियातून कमाई
इन्स्टाग्रामवर अनुष्काचे 59.3 मिलिअर फॉलोअर्स (Anushka Insta Followers) आहेत. इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी अनुष्का 95 लाख रुपये घेते. मुंबईत अनुष्काचं स्वत:चं अलिशान घर आहे. ज्याची किंमत जवळपास 9 कोटी रुपये इतकी आहे. 2014 मध्ये अनुष्काने हे घर खरेदी केलं होतं. विराटसारखाचं अनुष्कालाही महागड्या गाड्यांचा छंद आहे. तिच्याकडे BMW, Range Rover आणि Mercedes सारख्या महागड्या कार आहेत.