वयाच्या 65 व्या वर्षी Sunny Deol घेतोय परदेशात उपचार, प्रकृतीबद्दल मोठी Update

सनी देओल यांना नेमकं काय झालंय? विचारानंच चाहत्यांच्या काळजाचं पाणी   

Updated: Jul 25, 2022, 01:00 PM IST
वयाच्या 65 व्या वर्षी Sunny Deol घेतोय परदेशात उपचार,  प्रकृतीबद्दल मोठी Update title=

मुंबई : आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी परदेशात उपचारासाठी गेले. आता अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत.  पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या सनी यांच्यावर परदेशात उपचार सुरु आहेत.  दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीदरम्यान सनी देओल बेपत्ता असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण वाढता वाद पाहाता सनी यांच्या एका प्रवक्त्याने अभिनेते  निवडणुकीदरम्यान उपस्थित नसल्याचं कारण सांगितलं आहे. 

सनी देओल यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काही आठवड्यांपूर्वी एका शूटिंगदरम्यान सनी देओलच्या पाठीला दुखापत झाली होती. उपचारासाठी ते प्रथम मुंबईत होते. पण आराम वाटत नसल्यामुळे सध्या ते अमेरिकेत उपचारासाठी आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या. मात्र उपचार पूर्ण न झाल्याने सनी देशात नव्हते. पूर्ण बरे झाल्यानंतरच ते भारतात परततील.' अशी माहिती सनी देओल यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. 

सनी देओल यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट मिळाल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर, चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.