सुनील दत्तनंतर परेश रावल साकारणार 'या' रिअल लाईफ हिरोची भूमिका

अभिनेता परेश रावल यांची राजकरणामध्ये एन्ट्री झालेली असली तरीही ते बॉलिवूडमध्येही काम करत आहे.

Updated: Jun 11, 2018, 03:03 PM IST
सुनील दत्तनंतर परेश रावल साकारणार 'या' रिअल लाईफ हिरोची भूमिका  title=

मुंबई : अभिनेता परेश रावल यांची राजकरणामध्ये एन्ट्री झालेली असली तरीही ते बॉलिवूडमध्येही काम करत आहे. काही दिवसांपूर्वी सुनील दत्त नंतर आता एका नव्या चित्रपटातील परेश रावल यांचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

परेश रावल यांचा नवा चित्रपट 

परेश रावल उरी या आगामी चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटामध्ये एनएसए अजीत डोभाल यांची भूमिका परेश रावल साकारणार आहेत. या चित्रपटातील फर्स्ट लूक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

सर्बियामध्ये शूटिंग  

उरी या चित्रपटाचे शूटिंग सर्बियामध्ये होत आहे. या चित्रपटात यामी गौतम, विक्की कौशल महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. यामी गौतमनेही या चित्रपटासाठी मेकओव्हर केला आहे. यामी या चित्रपटात गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. 

परेश रावलांचे खास ट्विट 

परेश रावल यांनी ट्विट करताना 'चित्रपटात मी नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅडव्हायझर अजित डोभाल यांची भूमिका साकारत आहे. जीवनात असं क्वचितच होतं जेव्हा जीवनातील खर्‍या हिरोची भूमिका साकारण्याची तुम्हांला संधी मिळते' असे ट्विट केले आहे.

 

उरी या चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रुजवाला यांनी केले आहे. या चित्रपटाची कहाणी सर्जिकल स्ट्राईकवर आधारित आहे. 2016 साली सर्जिकल स्टाईक करण्यात आला होता.