मुंबई : कंगना राणौतने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावरुन कंगना राणौतवर निशाणा साधला आहे. 'मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही,' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं.
संजय राऊत यांचं हे ट्विट मात्र अभिनेता सुमित राघवनला पटलं नाही. 'माझे वडिल मराठी माणूस नाही आणि मीही नाही. पण मी अनेकांपेक्षा जास्त चांगलं मराठी बोलतो. मागच्या ३० वर्षांपेक्षा जास्त काळ मी मराठी रंगमंचावर काम करत आहे. माझी मुलंही मराठी शाळेत गेली. मी म्हणतो मुंबई ही कोणाच्याच बापाची नाही, मी दुष्मन झालो का? अतिशय चुकीचं विधान आहे तुमचं', असं ट्विट सुमित राघवन याने केलं आहे.
Sir,my father is not a marathi manoos nor am i. Born here. But I can speak better marathi than many,have been working on marathi stage for the past 30 yrs,my kids went to marathi schools. मी म्हणतो मुंबई ही कोणाच्याच बापाची नाहीए. मी दुष्मन झालो का?
अतिशय चुकीचं विधान आहे तुमचं. https://t.co/wYGU9fe33O pic.twitter.com/sOCyRD6i4u— Sumeet (@sumrag) September 4, 2020
संजय राऊत यांच्या या ट्विटला रिप्लाय करताना सुमित राघवन याने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट केला आहे.
संजय राऊत यांनी मला पुन्हा मुंबईत येऊ नको अशी धमकी दिली. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते. आता मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे? असा सवाल कंगनाने उपस्थित केला. यावरुन कंगनावर बॉलीवूड, मराठी इंडस्ट्री आणि राजकीय नेत्यांपासून सगळ्यांनी टीका केली.
दरम्यान कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.