भारत vs पाकिस्तान : मंचावर रंगणार नृत्यची जुगलबंदी

'हम लोक एक कभी नही हो सकते..'

Updated: Dec 18, 2019, 04:39 PM IST
भारत vs पाकिस्तान : मंचावर रंगणार नृत्यची जुगलबंदी title=

मुंबई : 'हम लोक एक कभी नही हो सकते..' भारत आणि पाकिस्तान हे दोन देश पारंपरिक शत्रू म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत खेळाच्या मैदानात आणि राजकारणात हे दोन देश एकामेकांच्या समोर आले. पण आता नृत्यांच्या मंचावर देखील भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहे. अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर 'स्ट्रीट डान्सर ३डी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भारत आणि पाकिस्तानमधील नृत्याची जुगलबंदी अनुभवता येणार आहे. 

कधीच दुसऱ्या क्रमांकावर न राहण्याचा वरूणच्या जीवनाचा नियम चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येणार आहे. चित्रपटात वरूण भारतीय डान्सर तर श्रद्धा पाकिस्तानच्या डान्सरची भूमिका साकारताना दिसत आहे. या दोन गटांमध्ये असणारं शत्रूत्व वरूण आणि श्रद्धाच्या डोळ्यांमध्य़े स्पष्टपणे झळकत आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्कंठा चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली होती. १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणारा चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवाय ट्विटरवर #StreetDancer3DTrailer चांगलाचं ट्रेन्ड होत आहे. ट्रेलर प्रदर्शनापूर्वीच हा ट्रेंड सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. 

चित्रपटाचा ट्रेलर नृत्यावर प्रचंड प्रेम करण्याऱ्यांसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे. चित्रपटामध्ये नृत्याचे गुरू प्रभूदेवांची भूमिका फारच कमालीची आहे. वरूणचा आगामी चित्रपट 'एबीसीडी'चा तिसरा भाग आहे. चित्रपटाच्या दोन भागांनी चाहत्यांच्या मनात घर केले होते. नृत्याच्या बाबतीत असणारी ओढ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.    

चित्रपटामध्ये अभिनेता अपारशक्ती खुराणा देखील भूमिका साकारताना दिसणार आहे. शिवाय पहिल्या दोन भागांमध्ये झळकलेले नृत्य कलाकार देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. २४ जानेवारी २०२० मध्ये 'स्ट्रीट डांन्सर ३ डी'  रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.