आर्थिक परिस्थितीचा सामना करतेय 'ही' प्रसिद्ध गायिका

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे.

Updated: May 25, 2021, 10:54 AM IST
आर्थिक परिस्थितीचा सामना करतेय 'ही' प्रसिद्ध गायिका title=

मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार देखील गेले आहेत. कोरोनामुळे सर्व सामान्य जनतेलाचं नाही तर सेलिब्रिटींना देखील आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. प्रसिद्ध गायिका सोना मेहापात्राने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली आहे. सोनाने सांगितलं की माझ्या सर्व ठेवीतले पैसे चित्रपटासाठी खर्च झाले आहेत. कोरोनामुळे ही सर्व परिस्थिती ओढावली आहे. 

सोना  मेहापात्राने एक सेल्फी पोस्ट करत कॅप्शनमध्ये वाईट परिस्थितीत देखील कसं आनंदी राहायचं हे सांगितलं आहे. 'संकटातून पळवाट काढता येत नाही, पण नाराज राहायचं की आनंदी हे तुमच्यावर अवलंबून आहे. माझा चित्रपट #ShutUpSona आजही सर्व जगात प्रवास करत आहे. फेस्टिवल जिंकत आहे.'

पुढे सोना म्हणाली, 'मी केलेली सर्व बचत या चित्रपटामुळे संपली आहे. महामारीने आपल्याला अशा ठिकाणी पोहोचवलं आहे. ज्याठिकाणी उत्पन्नाचा कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही.' तिच्या  या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.