'सराव करून घ्या..', अक्षय कुमारच्या खराब अभिनयामुळे 'या' अभिनेत्रीने दिग्दर्शकाला दिला सल्ला

Sridevi - Akshay Kumar : श्रीदेवी आणि अक्षय कुमार यांचा तो चित्रपट जो चक्क प्रदर्शित झाला 10 वर्षानंतर...

दिक्षा पाटील | Updated: Dec 14, 2024, 07:17 PM IST
'सराव करून घ्या..', अक्षय कुमारच्या खराब अभिनयामुळे 'या' अभिनेत्रीने दिग्दर्शकाला दिला सल्ला title=
(Photo Credit : Social Media)

Sridevi - Akshay Kumar : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यात त्यांच्यासोबत त्यांनी बड्या कलाकारांसोबतही काम केलं. त्यांची लोकप्रियता इतकी वाढली होती की त्यांच्यासमोर कोणताही स्टार हा कमी वाटू लागला होता. पण तुम्हाला माहितीये का त्यांचा देखील एक असा चित्रपट आहे जो थिएटरमध्ये 10 वर्ष प्रदर्शित झाला नव्हतं.

श्रीदेवी यांनी फक्त दाक्षिणात्य चित्रपटांमध्येच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील सुपरस्टार अशी ओळख मिळवली होती. श्रीदेवी यांचा एक असा चित्रपट आहे, जो आजही प्रेक्षकांच्या लक्षात असेल. त्याचं कारण त्याची हटके स्टोरी किंवा त्यांची हीरोसोबत असलेली केमिस्ट्री नाही तर त्याचं खरं कारण म्हणजे हा चित्रपट विना क्लायमॅक्स प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘मेरी बीवी का जवाब नहीं’ हा होता. या चित्रपटाचं शूटिंग 1994 मध्ये झालं होतं आणि या चित्रपटात श्रीदेवी आणि अक्षय कुमार हे एक कपलच्या भूमिकेत दिसले होते. पंकज पराशर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट 10 वर्षांनंतर थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. खरंतर अनेकदा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण काही ना काही कारणामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख ही सतत पुढे ढकलण्यात येत होती. 

चित्रपटाचे दिग्दर्शक पंकज पराशर यांनी शूटिंगचा किस्से शेअर केले होते. त्यापैकी एक म्हणजे एकदा श्रीदेवी अक्षय कुमारमुळे चिडल्या होत्या. "अक्षय कुमार श्रीदेवी यांच्या समोर नर्वस व्हायचा. आज तो अप्रतिम अभिनय करत असला, तरी त्यावेळी श्रीदेवी यांच्यासमोर तो घाबरायचा. एक असा सीन होता ज्यासाठी त्याला सतत टेक घ्यावे लागत होते आणि अखेर कंटाळून श्रीदेवीनं सांगितलं, की 'बाबा, याच्याकडून रिहर्सल करुन घ्या. कारण तो आधीच 36 टेक घेतोय.' "

हेही वाचा : '...तर मी अंडरवर्ल्डमध्ये असतो'; नाना पाटेकरांचा खुलासा

पंकज पराशर यांनी सांगितलं की तो एक कोर्टरुमचा सीन होता आणि खूप मोठा सीन होता. त्यांना या सीनला तुकड्यात तोडून शूट करायचा नव्हता, कारण त्यामुळे एका कलाकाराची हिंम्मत कमी होते. 36 टेकनंतरही अक्षय कुमार तो सीन करु शकत नव्हता. त्यामुळे श्रीदेवी चिडल्या. अखेर जेव्हा अक्षय कुमारनं तो सीन व्यवस्थीत दिला तेव्हा त्याचा उत्साह वाढवण्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दरम्यान, जेव्हा 10 वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा सगळ्या प्रेक्षकांचा उत्साह हा कमी झाला होता. विना क्लायमॅक्स प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली नाही.