श्रीदेवी आपल्या दोन्ही मुलींसाठी सोडून गेली एवढी संपत्ती

1 करोड रुपये मानधन आकारणारी अभिनेत्री श्रीदेवी ठरली सुपरस्टार. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 28, 2018, 08:45 AM IST
श्रीदेवी आपल्या दोन्ही मुलींसाठी सोडून गेली एवढी संपत्ती title=

मुंबई : 1 करोड रुपये मानधन आकारणारी अभिनेत्री श्रीदेवी ठरली सुपरस्टार. 

श्रीदेवी बॉलिवूडची पहिली महिला अभिनेत्री ठरली जिने सुपरस्टारचा मान पटकावला. वयाच्या चौथ्या वर्षापासून श्रीदेवी यांनी सिनेसृष्टीत आपलं योगदान दिलं आहे. 50 वर्षाी त्यांची अभिनयाची कारकिर्द आहे. आपल्या अनेक सिनेमांमध्ये श्रीदेवींनी आपली अनोखी छाप सोडली आहे. चांदनी, सदमा, लम्हे सारखे सिनेमे आजही अजरामर आहे. 

बोनी कपूरशी लग्न केल्यानंतर त्यांनी एक प्रकार बॉलिवूडमधून सन्सास घेतला. आपलं कुटुंब आणि मुलींकडे लक्ष देण्याच श्रीदेवींनी ठरवलं. मात्र तब्बल 13 वर्षानंतर २०१२ मध्ये ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केले. या चित्रपटातील त्यांचा अभिनय कौतुकास पात्र ठरला. त्यांची सुदरता आणि लोकप्रियता पाहता ग्लोबल ब्रॅण्ड्सने त्यांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविले. 

श्रीदेवींनी मुलींना ठेवली एवढी संपत्ती 

श्रीदेवींनी आपल्या मागे संपत्तीचा वारसदार पती बोनी कपूर यांना न ठेवता. आपल्या दोन्ही मुलींना संपत्तीचा अधिकार दिला आहे. श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत मुंबईतील अंधेरी वेस्टमध्ये असलेल्या एका शानदार बंगल्यात राहायच्या. श्रीदेवी यांची १३ कोटी रुपये वार्षिक कमाई असल्याचे बोलले जाते. त्या एका चित्रपटासाठी साडेतीन ते चार कोटी रुपये फीस स्वीकारत असत. ‘इंग्लिश-विंग्लिश’मध्ये दमदार कमबॅक केल्यानंतर त्यांच्या फीसमध्ये तब्बल २४ टक्के वाढ झाली होती.

२४७ कोटी रूपयांची संपत्ती

मिळालेल्या माहितनुसार, २०१८ मध्ये श्रीदेवी यांची मालमत्ता ३५ मिलियन डॉलर म्हणजे, २२७ कोटी रपये इतकी झाली होती. याशिवाय त्यांच्याके याशिवाय महागड्या लक्झरी गाड्याही होत्या. त्याच्या एकूण मालमत्तेची बेरीज करता जवळापस ती २४७ इतकी होते. आश्चर्यकारक असे की, गेल्या काही वर्षांत त्यांची संपत्ती ही सरासरी २४ टक्क्यांनी वाढत होती. २०११ मध्ये त्यांनी जेव्हा बॉलिवुडमध्ये पदार्पण केले तेव्हा, त्यांची वार्षिक कमाई १३ कोटी रूपयांवर पोहोचली होती.