श्रीदेवी यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या

श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडलाच नाही तर जगाला भूरळ पाडली होती. 

Updated: Oct 29, 2022, 05:07 PM IST
श्रीदेवी यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या  title=
sridevi just because of this reason dont want to work in bollywood janhvi kapoor nz

Janhvi Kapoor Latest Interview: बॉलिवूडची चांदणी अशी ओळख असणाऱ्या श्रीदेवी यांनी 2018 ला जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडलाच नाही तर जगाला भूरळ पाडली होती. श्रीदेवी यांना बॉलिवूडची लेडी अमिताभ म्हणून देखील ओळखतात. त्यांनी अनेक सूपरहिट चित्रपटांत काम केले आहे. आजही त्यांची उणीव चाहत्यांच्या मनात आणि बॉलिवूडमध्ये जाणवते. तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली होती आणि पाहता पाहता मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास त्यांनी गाठला. (Why did Sridevi decide not to act in films nz)

हे ही वाचा - Katrina Kaif च्या सासूसारखी कोणीच नाही; कॅटला प्रेमाने म्हणते...

श्रीदेवी यांचे एक स्वप्न होतं की, त्यांनी या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर राज्य करावे आणि त्यांचे ते स्वप्न पूर्ण देखील झाले. पण एकेदिवशी बालपणी पाहिलेलं स्वप्न पाठीशी टाकून मुलींच्या संगोपणाकरिता काम न करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्ष अभिनयापासून दूर राहिल्यानंतर श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून पुन्हा पदार्पण केलं. सिनेमाचं दिग्दर्शन गौरी शिंदे यांनी केलं. त्या चित्रपटादरम्यानचा एक किस्सा जान्हवी कपूरने सांगितला. 

हे ही वाचा - Baba Vanga नाहीतर चक्क Kangana Ranaut ने केली होती ट्विटर संदर्भात भविष्यवाणी, आणि घडलं ही तसंच

मला आठवते की माझी आई 'इंग्लिश विंग्लिश'चे शूटिंग करत होती, त्याच दरम्यान तिला खुशीचा वाढदिवस आठवला नाही. ती खूप निराश झाली, तिने आम्हाला कॉल केला आणि सांगितले - मला अभिनय करायचा नाही, मला माझ्या मुलांसोबत राहायचे आहे. अशा परिस्थितीत जान्हवी तिच्या आईला म्हणाली- आई, तू नाराज होऊ नकोस, तू नेहमी आमच्यासोबत आहेस आणि आम्ही नेहमीच सोबत राहू. त्यावेळी तिच्या भावना मी समजू शकले नाही, पण आज खऱ्या अर्थाने समजते.

हे ही वाचा - ...अन् हुमा कुरेशीनं लगावली सोनाक्षी सिन्हाच्या कानशिलात, Video आला समोर

 

तिनं हा किस्सा तिची बहिण खूशीच्या बॉलिवूड पदार्पणावेळेस सांगितला. जान्हवीने सांगितले की, तिला  ही तिच्या आईप्रमाणे खूशीच्या प्रत्येक लहानमोठ्या आनंदात सामील व्हायचे आहे. तिच्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या शूटपासून ते शेवटच्या दिवसाच्या शूटपर्यंत तिला खूशीसोबत राहायचे आहे. एकेदिवशी जान्हवी खुशीच्या पहिल्या दिवसाच्या शूटला उशिरा पोहोचली होती त्यामुळे पहिला शॉट चुकवावा लागला होता. यादरम्यान, जान्हवीला खूप वाईट वाटले.