36चा आकडा असूनही 'मिस हवाहवाई'च्या निधनानंतर Jaya Prada यांनी लिहिलं असं काही... काय होतं वादाचं कारण?

Sridevi and Jaya Prada : त्या काळात श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यातील टक्कर हे जगजाहीर होती. त्या एका चित्रपटामुळे त्या दोघींमध्ये वैर झालं. 

नेहा चौधरी | Updated: Apr 24, 2024, 10:38 AM IST
36चा आकडा असूनही 'मिस हवाहवाई'च्या निधनानंतर Jaya Prada यांनी लिहिलं असं काही... काय होतं वादाचं कारण? title=
sridevi and jaya prada dushmani What was the reason for the controversy jayaprada reaction on sridevi death

Jaya Prada On Sridevi Death : श्रीदेवी आपल्यामध्ये नाही पण त्यांच्या दमदार अभिनयाने ती चाहत्यांचा मनात राज्य करते. तिच्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं होतं. त्या काळात श्रीदेवीसोबत जया प्रदाही सौंदर्याची राणी होती. या दोघींनी एकत्र अनेक चित्रपटात काम केलं. एवढंच नाही तर या दोघींच्या जोडीचा चित्रपट सुपरहिट देखील ठरले. मग असं काय झालं की या दोघींमध्ये नेहमीच 36चा आकडा पाहिला मिळाला. 

या चित्रपटानंतर दोघींमध्ये शीतयुद्ध

या दोघींनी जवळपास 8 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं पण मीडिया रिपोर्टनुसार या दोघी सेटवर बोलत नव्हत्या. श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यातील शीतयुद्धाला सुरुवात झाली ती नागिन या चित्रपटानंतर. मीडिया रिपोर्टनुसार नागिन हा चित्रपट आधी जयाप्रधा यांना ऑफर करण्यात आला होता. पण नंतर निर्मात्यांनी आपल्या निर्णय बदलला आणि जयाप्रदा यांना डच्चू दिला. मग नागिनमध्ये वर्णी लागली ती श्रीदेवीची. या चित्रपटानंतर जया प्रदा यांनी श्रीदेवीशी बोलणं कायमचं बंद केलं. कधी त्या एकमेकांच्या समोर आल्या तर त्या दुर्लक्ष करुन निघून जायच्या. 

...म्हणून त्या दोघींना एका खोलीत बंद केलं

हा किस्सा आहे मकसद या चित्रपटाच्या वेळीचा. मकसद या चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी श्रीदेवी आणि जया प्रदा यांनी बोलावं यासाठी राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी एक युक्ती केली होती. श्रीदेवी आणि जया प्रदा यांना काही दिवसांसाठी एका खोलीत त्यांनी बंद केलं होतं. पण जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तर काय या दोघी वेगवेगळ्या कोपऱ्यात बसलेल्या दिसल्या. 

हवाहवाईच्या मृत्यूनंतर जयाप्रदा या म्हणाल्यात...

24 फेब्रुवारी 2018 ला ती बातमी आणि सिनेसृष्टीसह सगळ्यांच धक्का बसला. श्रीदेवी यांचं निधन झालं. दुबईतील एका मोठ्या हॉटेलच्या बाथरूमच्या बाथटबमध्ये त्याचा मृतदेह आढळला होता. त्या कुटुंबातील लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईल्या गेल्या होत्या. त्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते फोटो पाहून कोणालाही वाटलं नाही की दुसऱ्या दिवशी अशी काही बातमी समोर येईल म्हणून...

श्रीदेवी यांचं निधनानंतर जयाप्रदा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ज्यात श्रीदेवीसोबतचा एक फोटो त्यांनी शेअर केला. त्यावर लिहिलं की, ''तुझं स्मित हास्य आमच्या हृदयात नेहमीच जिवंत राहिल. ती एका सुंदर परीसारखी होती आणि आजही ती आपल्यामध्ये आहे. या दु:खद क्षणी त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना.''

तर एका रियलिटी शो दरम्यान जया प्रदा म्हणाल्या होत्या की, ''मला श्रीदेवीची खूप आठवण येते. जर ती माझ्या आवाज ऐकत असेल तर मी तिला सांगू इच्छिते की, काश आपण बोल एकमेकांशी बोलू शकलो असतो.''