गौरव मोरेच्या 'या' कृत्याची जुही चावला झाली फॅन!

Gaurav More, Juhi Chawla : 'तू है मेरी किरण' गाणं आणि गौरव मोरेची हटके स्टाईल... फिल्टरपाड्याच्या गौवरची जुही चावला झाली फॅन

दिक्षा पाटील | Updated: Apr 24, 2024, 10:32 AM IST
गौरव मोरेच्या 'या' कृत्याची जुही चावला झाली फॅन!  title=
(Photo Credit : Social Media)

Gaurav More, Juhi Chawla : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून अभिनेता गौरव मोरे हा घराघरात पोहोचला. गौरव आता फक्त मराठी नाही तर हिंदी शोमध्ये देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जाणार गौरव मोरे हा त्याच्या विनोदाच्या अचूक टायमिंग साधत गौरवनं महाराष्ट्रातील सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि आता हिंदीत तो मंच गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.  गेल्या काही दिवसांपासून गौरवच्या या धमाकेदार कॉमेडीवर हिंदी प्रेक्षकही खळखळून हसत आहेत आणि तो प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन करत आहे. सध्या सोशल मीडियावर गौरव आणि बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय आणि त्यामागचं कारण देखील तितकच खास आहे. 

गौरवने काही दिवसांपूर्वीच ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात दणक्यात एन्ट्री घेऊन पहिल्याच भागात जबरदस्त परफॉर्मन्स दिला. गौरवनं यावेळी चक्क जुही चावला हिला इम्प्रेस झाली आहे. जुही चावला आणि बॉलिवूड किंग शाहरुख खान यांच्या आयकॉनिक ‘डर’ चित्रपटातील किंग खानचं भूमिका गौरव रिक्रिएट करणार असून 'तू है मेरी किरण' हे गाणं गात गौरव शाहरुखची हुबेहूब नक्कल करत असल्याचं प्रोमो मध्ये पाहायला मिळालं. गौरव जुहीला गुडघ्यावर बसून गुलाब देतो गुलाबाच्या पाकळ्यांची तिच्यावर उधळण करतो हे सगळं लवकरच पाहायला मिळणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गौरव या सगळ्या बद्दल बोलताना म्हणाला, "मॅडनेस मचाएंगे' सुरू होऊन अगदीच काही दिवस झाले आहेत आणि हिंदीत एवढा कमालीचा शो करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मराठीच्या सोबतीनं हिंदी प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम ही माझ्या कामाची पोचपावती आहे आणि अजून उत्तम काम करण्याची एक प्रेरणा देखील आहे. या शोमध्ये अजून धमाल मज्जा मस्ती करायची आहे पण जूही चावला मॅम सोबत मला स्टेज शेयर करायला मिळणं हे एक सुख आहे."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गौरव 'मॅडनेस मचाएंगे' मध्ये तुफान लोकप्रिय होत असून मराठी प्रमाणं हिंदीत सुद्धा त्यानं आपल्या कमाल कामगिरीनं प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. तर गौरव लवकरच 'अल्याड पल्याड' या चित्रपटात झळकणार असून याशिवाय  त्याच्याकडे 'महापरिनिर्वाण' हा चित्रपट देखील दिसणार आहे.