कास्टिंग काऊचपासून वाचण्यासाठी निना गुप्ताकडून मुलींना खास टिप्सs

झगमगत्या विश्वातील सर्वात कटू सत्य म्हणजे अभिनेत्रींच्या वाट्याला येणारा कास्टिंग काऊचचा अनुभव. 

Updated: Aug 7, 2021, 07:14 AM IST
कास्टिंग काऊचपासून वाचण्यासाठी निना गुप्ताकडून मुलींना खास टिप्सs title=

मुंबई : झगमगत्या विश्वातील सर्वात कटू सत्य म्हणजे अभिनेत्रींच्या वाट्याला येणारा कास्टिंग काऊचचा अनुभव. बॉलिवूडमध्ये अभिनत्री त्यांच्या वाट्याला आलेल्या  कास्टिंग काऊचचा अनुभव उघडपणे सांगतात. . सुरवीन चावला, कंगना रनौत, राधिका आपटे, चित्रांगदा सिंह यांनी देखील कास्टिंग काऊच प्रकरणी आपला अनुभव सांगितला आहे.  गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री निना गुप्ता यांनी त्यांच्या आयुष्यात अनेत कठीण प्रसंगांना तोंड  दिलं आहे. 

आता निना गुप्ता यांनी कास्टिंग काऊचपासून वाचण्यासाठी नव्या अभिनेत्रींना टिप्स दिल्या आहेत. आमची सहयोगी वेबसाईट Bollywoodlife.com ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नव्या अभिनेत्रींना सल्ला दिला आहे. कस्टिंग काऊच इंडस्ट्रीमधून नाहीसा झाला आहे की नाही असा प्रश्न निना गुप्ता यांना विचारण्यात आला. 

यावर निना गुप्ता म्हणाल्या, 'कोणीही 60 वर्षांच्या महिलेला कास्टिंग काऊचसाठी बोलवणार नाही. मला असं वाटतं प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. त्यामुळे दुसऱ्याच्या प्रवासानुसार आपला मार्ग निवडता कामा नये. माझ्या पाऊलावर पाऊल ठेवून चालणाऱ्यांना मला जे  मिळालं ते मिळणार नाही.  काही गोष्टी मिळणं फार कठीण असतं. '

पुढे निना म्हणाल्या, 'प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. त्यामुळे  प्रत्येक मुलीने फक्त मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पुढे जावं. एवढंच नाही तर लक्ष्य ठरवावं. त्यानंतर सगळे काही योग्य मार्गावर येतं.' असं सांगत निना गुप्ता यांनी कास्टिंग काऊच  पासून वाचण्यासाठी मुलींना महत्त्वाचा सल्ला दिला.