आई -वडिलांच्या घटस्फोटावर सारा अली खानकडून मोठा खुलासा

सारा अली खानने 'केदारनाथ' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली

Updated: Aug 6, 2021, 11:01 PM IST
आई -वडिलांच्या घटस्फोटावर सारा अली खानकडून मोठा खुलासा title=

मुंबई : सारा अली खानला सध्याच्या सर्व अभिनेत्रींमध्ये खूप मागणी आहे. साराने 'केदारनाथ' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करते.

कोरोनाच्या काळात चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी सारा इन्स्टाग्रामवर थेट लाईव्ह येते आणि गप्पा मारते. त्याचबरोबर अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर निर्दोषपणे आपलं मत व्यक्त करताना दिसते. सारा लवकरच वूटचा शो फीट अप विथ द स्टार्सच्या सीझन 3 मध्ये दिसणार आहे. यादरम्यान, ती तिचे वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांच्यातील संबंधांवर बोलताना दिसणार आहे.

शोशी संबंधित क्लिपमध्ये सारा तिच्या पालकांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत आहे. आई आणि वडिलांच्या विभक्ततेदरम्यान तिला अनेक गोष्टींना कसे तोंड द्यावं लागलं हे अभिनेत्रीने सांगितलं. यावर बोलताना सारा म्हणाली की, जेव्हा तुमच्याकडे पर्याय असतील तेव्हा हे अगदी सोपम आहे. जिथे कोणीही आनंदी नाही आणि वेगळे राहतात. तुम्ही तिथे राहा जेथे प्रत्येकजण त्याच्या आयुष्यात आनंदी आहे.

यासोबतच अभिनेत्रीने असंही म्हटलं की, दोघांना वेगळे करण्याचा निर्णय योग्य होता कारण दोघं एकत्र आनंदी नव्हते. दोघांच्या घटस्फोटानंतर, मी माझ्या आईबरोबर राहते आणि ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे पण माझे वडील नेहमीच माझ्यासाठी असतात. सारा असंही म्हणाली की, तिच्या मते दोघांचं वेगळे होणे हा एक चांगला निर्णय होता. सैफ आणि अमृताचं लग्न 1991 मध्ये झालं आणि लग्नानंतर 20 वर्षांनी 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.