व्हिडिओ : श्रीदेवींच्या अंतिमयात्रे दरम्यान कोणावर भडकली सोनम कपूर

  अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत अकाली मृत्यू झाला.

Updated: Mar 1, 2018, 07:31 PM IST
व्हिडिओ : श्रीदेवींच्या अंतिमयात्रे दरम्यान कोणावर भडकली सोनम कपूर   title=

मुंबई :  अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत अकाली मृत्यू झाला.

वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीचे निधन टबबाथमध्ये बुडून झाले. श्रीदेवीच्या  अकाली निधनामुळे त्यांचे चाहते सोबतच अवघे बॉलिवूडही हळहळले आहे. 

अनिल कपूरच्या घरी श्रीदेवींच्या मुली 

अभिनेत्री श्रीदेवीचे निधन शनिवारी ( 24 फेब्रुवारी) रोजी रात्री दुबईत झाले. मृत्यूनंतर 72 तासाने श्रीदेवींचे पार्थिव प्रायव्हेट जेटने मुंबईत आणण्यात आले. दरम्यान श्रीदेवींच्या मुली भारतात अनिल कपूर यांच्याकडे होत्या. जान्हवी आणि खुशी कपूरचे सांत्वन करण्यासाठी आणि श्रीदेवींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अवघे बॉलिवूड लोटले होते. 

गर्दीवर भडकली सोनम कपूर  

 

लोखंडवाला येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये अंतिमदर्शनासाठी श्रीदेवींचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी श्रीदेवींचे पार्थिव विलेपार्ले येथील सेवा समाज हिंदू स्मशानभूमीत आणले होते. मात्र श्रीदेवींच्या चाहत्यांची, मीडियाची गर्दी असल्याने सोनम कपूरला गर्दीतून वाट काढत पुढे जाणं कठीण झालं होतं. अशातच मीडियाचे  कॅमेरे, फोटो टिपण्यासाठी होणारी गर्दी पाहून सोनम भडकली. सोनमचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.