नो मेकअप लुकमध्ये अशी दिसते सोनम कपूर; डार्क सर्कल्स पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

Sonam Kapoor No Makeup Look: सोनम कपूर आपल्या हटके फॅशनसाठी कायमच ओळखली जाते. परंतु सध्या तिचा लो मेकअप लुकसाठीही चांगलीच ओळखली जाते. सध्या तिचे असेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 8, 2023, 07:11 PM IST
नो मेकअप लुकमध्ये अशी दिसते सोनम कपूर; डार्क सर्कल्स पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का  title=
July 8, 2023 | sonam kapoor no makeup look goes viral netizens trolls her after seeing her dark circles

Sonam Kapoor Dark Circles: सोनम कपूर आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशनसेन्ससाठी ती कायमच ओळखली जाते. त्यामुळेच तिची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. सध्या तिचा 'ब्लाईन्ड' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सोबतच या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असून आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सध्या सोनमच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. सोनमचा हा कमबॅक सिनेमा आहे. याआधी आलेल्या तिच्या विरे दी वेडिंग आणि झोया फॅक्टर या चित्रपटानंतर तिचा हा मोठा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणि तिच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. सोनम आपल्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते त्याचसोबत वर म्हटल्याप्रमाणे ती तिच्या फॅशनसाठीही जास्त ओळखली जाते. 

सोनम ही अनेकदा मोठ्या फॅशन शोजना देखील हजेरी लावते. त्याचसोबत अनेकदा ती आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून आपल्या मेकअपचे व्हिडीओही पोस्ट करतान दिसते ज्यात ती चेहऱ्याला फाऊंडेशन कसे लावावे त्यानंतर मेकअप कसा करावा? कोणते आयलाईनर वापरावे सोबतच कोणती लिपस्टिक वापरावी याबद्दल ती चाहत्यांना चांगलीच अपडेट करताना दिसते. परंतु यावेळी तिची एका कारणासाठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे तिच्या डोळ्यांखाली येणाऱ्या डार्क सर्कलची. वय वाढत गेले की स्किन प्रोब्लेम्सही वाढताना दिसतात. त्यामुळे त्यासाठी काय काय उपाय करावे यासाठी जाहिराती येताना दिसतात. 

हेही वाचा - होणाऱ्या सासूबाईंना प्रथमेशनं दिल्या खास वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'या' नावानं मारतो हाक!

त्यातून आता तिचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत आणि त्याबद्दल नेटकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. सोनम हे मेकअपमध्ये अतिशय सुंदर दिसते तेव्हा ती आपले डार्क सर्कल्स लपवते असे वाटते. सध्या सोनम आपल्या लाडक्या लेकाच्या वायूच्या संगोपनात व्यस्त आहे त्यामुळे आपल्या लाडक्या लेकासह ती आपले फोटोज आणि व्हिडीओज शेअर करताना दिसते. अद्याप तिनं आपल्या लाडक्या लेकाचा चेहरा शेअर केलेला नाही त्यामुळे चाहत्यांना तिच्या लेकाचा फोटो पाहण्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. ती तिच्या लेकाचा फोटो शेअर करते तेव्हा तिचा लेक कसा दिसतो हे शोधण्याचा ते प्रयत्न करत असतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नो मेकअप लुकचे फोटोही ती अनेकदा शेअर करताना दिसते त्यामुळे तिच्या डोळ्याखालचे डार्क सर्कल्स पाहून नेटकरी तिला ट्रोल करतानाही दिसत आहेत. काही दिवसांपुर्वीही तिनं नो मेकअप लुक पोस्ट केला होता ज्यामुळे तिच्या त्या फोटोची चांगलीच चर्चा रंगलेली होती.