लग्नानंतर अभिनेत्रींच्या करिअरवर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला सोनमचे जबरदस्त उत्तर...

सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत.

Updated: Apr 25, 2018, 10:13 PM IST
लग्नानंतर अभिनेत्रींच्या करिअरवर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला सोनमचे जबरदस्त उत्तर... title=

मुंबई : करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तैमुरच्या जन्मानंतर या सिनेमातून करिना पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलरमध्ये करिना, सोनम, स्वरा आणि शिखा यांचा मजेदार अंदाज पाहायला मिळतो. त्यातच सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत. या ट्रेलर लॉन्चिंगला सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया या अभिनेत्री उपस्थित होत्या. याच कार्यक्रमादरम्यान सोनमला लग्न आणि करिअरबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला तिने जबरदस्त उत्तर दिले आहे.

काय विचारला प्रश्न?

लग्न, प्रेग्‍नेंसीनंतर काम आणि त्यानंतर येणाऱ्या समस्यांवर प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना सोनम म्हणाली की, लग्नानंतर काम करणार का? असे प्रश्न कधी पुरुषांना का विचारले जात नाहीत. अशा प्रकारची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. पुढे सोनम म्हणाली की, शाहीद कपूरचेही लग्न झाले आहे. त्याला कोणी विचारले का की तू लग्नानंतरही काम करणार का?

पहा सोनमने काय उत्तर दिले

 

लवकरच सिनेमा होईल प्रदर्शित

१ जूनला वीरे दी वेडींग हा सिनेमा प्रदर्शित होईल. सिनेमाची निर्मिती बालाजी टेलीफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म्सने मिळून केली आहे. तर दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये चार मैत्रिणींचे बॉडिंग पाहायला मिळते. तर सोनम करिनाचा बोल्ड अंदाजही पाहायला मिळत आहे.