आधी baby bump आता प्रेग्नंन्सीनंतर वजन लपवताना दिसली Sonam Kapoor? नवा लुक पाहून चाहते हैराण

प्रेग्नेंसीनंतर सोनम कपूरचा स्टायलिश लूक पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.

Updated: Oct 29, 2022, 05:40 PM IST
आधी baby bump आता प्रेग्नंन्सीनंतर वजन लपवताना दिसली Sonam Kapoor? नवा लुक पाहून चाहते हैराण title=

Sonam Kapoor New Look: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने 20 ऑगस्ट रोजी पहिल्या मुलाला जन्म दिला. सोनम आणि आनंद आहुजा (Sonam Kapoor and Anand Ahuja) यांनी त्यांच्या मुलाचे नाव वायु कपूर आहुजा ठेवले आहे. चाहते अजूनही त्यांच्या मुलाची पहिली झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. आजकाल सोनम वायुच्या संगोपनात व्यस्त आहे. याशिवाय ती आपले शरीर पुन्हा आकारात आणण्यासाठी जिममध्ये खूप घाम गाळत आहे. आपल्या फिटनेसचाही आवर्जून विचार करते आहे. आता तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रेग्नेंसीनंतर सोनम कपूरचा स्टायलिश लूक पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.

व्हिडिओमध्ये सोनम कपूर ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. काही लोक सोनमच्या लूकचे कौतुक करत आहेत तर काहीजण तिच्या प्रेग्नेंसी वजनावरून तिला ट्रोल करत आहेत. सोनमच्या एका चाहत्याने तिची प्रशंसा करत एक कमेंट लिहिली, 'तुम्ही प्रेग्नन्सी फॅट्स खूप कमी केले आहेत ' तर तिथेच दुसर्‍याने लिहिले, 'मी आता तुम्ही कर्वमध्ये दिसताय'.

याशिवाय काही लोक असेही आहेत जे सोनम कपूरच्या लूकवर समाधानी नाहीत. एका यूजरने लिहिले- 'तू खूप लठ्ठ झाला आहात, लवकर काहीतरी करा'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनम कपूरने 20 ऑगस्ट 2022 रोजी मुलगा वायुला जन्म दिला. ही आनंदाची बातमी त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. मात्र, अजूनही सोनम आणि आनंदने आपल्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. सोनमने दिवाळीच्या फोटोंमध्येही तिच्या मुलाचा चेहरा लपवला होता. याशिवाय सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. पण लवकरच ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.