मुंबई : महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असते. बऱ्याचदा सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात. आपल्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेट आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर शेअर करताना दिसतात.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील आपले हॅपी मुव्हमेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते..नुकतेच सोनालीने पती कुणाल बेनोडेकरसोबत जंगलात भटकंती करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.ज्यात मिस्टर आणि मिसेस बेनोडेकर यांनी जंगलात आपलं एक छोटंस घरं बनवलंय. निसर्गरम्य अशा वातावरणात या जोडीने एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड केलाये.
सध्या सोनाली दुबईत आहे. त्यामुळे सतत घरात राहून कंटाळलेल्या या दोघांनी थेट जंगलात भटंकती करण्याचा प्लॅन केला, आणि एकत्र वेळ घालवण्याचं ठरवलं. दोघांचा हा गोड व्हिडिओ सोनालीने शेअर करत" We like making memories in our hiking shoes! " असं कॅप्शनमध्ये म्हटलंय.
7 मे रोजी कुणालसोबत लग्नगाठ बांधत सोनालीने आपल्या सुखी संसाराला सुरुवात केलीये. सोनाली सध्या सिने स्क्रिनपासून जरी दूर असली तरी ती शेअर करत असलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं.