Happy Birthday Soha Ali Khan : ही चिमुकली नवाब घराण्यातील लाडकी लेक आहे. या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. या चिमुकलीचे वडिलांचं क्रिकेटशी जवळचं संबंध आहे. पतौडी कुटुंबात जन्मलेली सोहा अली खान 45 वर्षांची आहे. सोहाचा जन्म 4 ऑक्टोबर 1978 मध्ये झाला. सोहाचे वडील मन्सूर अली खान हे पतौडी घराण्याचे नववे नवाब होते. तर आई शर्मिला टागोर 70-80 दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती.
सोहा घरातील तीन नंबरची आणि लहान मुलगी. मोठी बहीण सबा अली खान ज्वेलरी डिझायनर आहे. सबा हिचं स्वत:चं डायमंड चेन सुरु केलं आहे. तर सैफ अली खान याच्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. सोहाने दिल्लीतील ब्रिटिश स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. त्यानंतर पुढच्या शिक्षण तिने लंडनमधील ऑक्सफर्डमधून घेतलं. त्यानंतर तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.
सोहाने शिक्षण पूर्ण केल्यावर बँकेत काम केलं. फोर्ड फाऊंडेशन आणि सिटी बँकेत ती कामावर होती. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. 2004 मध्ये सोहा अली खानने 'इति श्रीकांता' या बंगाली चित्रपटात काम केलं. त्यानंतर ती हिंदी सिनेमा 'दिल मांगे मोर'मधून शाहिद कपूरसोबत दिसली. आईची हुबेहुब कॉपी असणारी सोहाला 2006 मध्ये आलेल्या 'रंग दे बसंती' चित्रपटातून खरी ओळख मिळाली. या चित्रपटासाठी तिला आयफा आणि झिफाचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
चित्रपटासृष्टीत तिचं करिअर फार काही खास राहिलं नाही. मात्र वैयक्तिक आयुष्यामुळे ती कायम चर्चेत असते. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार सोहा अली खान लग्नाआधीच प्रेग्नंट होतं असं म्हणतात. 2015 मध्ये सोहाने प्रियकर आणि अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न केलं. पण लग्नाच्या 7 महिन्यांनंतर तिला मुलगी झाली.
मीडिया रिपोर्टनुसार सोहा कुणालसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. यासाठी खुद्द आई शर्मिला टागोर यांनी तिला परवानगीही दिली होती. कुणाल आणि सोहा तब्बल 7 वर्षे लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र सैफ अली खानला सोहा आणि कुणालसोबतचं नातं पसंत नव्हतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार शर्मिलाने सोहा आणि कुणालच्या लग्नात त्यांना 9 कोटी रुपयांचा फ्लॅट गिफ्ट केला होता. सोहा मुलगी इनाया हिच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तर नुकतेच तिने गर्भधारणेबाबत एक पुस्तकही लिहिलंय.