शिल्पा शेट्टी आणि लेक समिषाचा शॉपिंगचा Cute Video समोर, तुम्ही पाहिलात का?

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 15, 2022, 12:14 PM IST
शिल्पा शेट्टी आणि लेक समिषाचा शॉपिंगचा Cute Video समोर, तुम्ही पाहिलात का?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. अशात शिल्पाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : त्यांच्यापासून दूर राहा...; बिग बींना कोणापासून आहे धोका?

शिल्पा आणि तिची मुलगी समिषा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिल्पा अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर समिशाचे क्यूट व्हिडिओ शेअर करत असते. समिशाचे हे व्हिडिओ काही मिनिटांत व्हायरल होतात. 

हेही वाचा : डेनिम वर पैंजण घातलं, म्हणजे गावंढळ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

आता समोर आलेला शिल्पा आणि समिशाचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांची मनं भारावून गेली आहेत. व्हिडिओमध्ये समिषा आई शिल्पा शेट्टीसोबत कारमधून बाहेर पडते. तेथे एक बॉडीबिल्डर देखील आहे, जो लगेच पुढे जातो आणि कारचा दरवाजा उघडतो. शिल्पानं 2009 मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिल्पा आणि राज यांनी 2020 मध्ये सरोगसीद्वारे समिशाला जन्म दिला. शिल्पा आणि राजला विआन नावाचा एक मुलगाही आहे. समिशा फेब्रुवारी 2022 मध्ये 2 वर्षांची झाली. 

हेही वाचा : 'मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळतं...', रितेश देशमुखच्या 'त्या' वक्तव्यामुळे एकच खळबळ

प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शिल्पा या वर्षी रिलीज झालेल्या 'निकम्मा' चित्रपटात दिसली होती. ती लवकरच 'सुखी' चित्रपटात आणि रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय यांच्याही भूमिका आहेत.