मलायका घेऊ पाहाते 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची जागा, खास व्यक्तीच्या एन्ट्रीने होणार उलगडा

मलायकाला हवीये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची जागा, त्यानंतर अभिनेत्रीला मिळणार खास गिफ्ट, 'त्या' व्यक्तीच्या एन्ट्रीने होणार उडगडा  

Updated: Mar 20, 2022, 02:13 PM IST
मलायका घेऊ पाहाते 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची जागा, खास व्यक्तीच्या एन्ट्रीने होणार उलगडा title=

मुंबई : झगमगत्या विश्वात कलाकारांचे वाद कायम रंगलेले असतात. कोण काही कोणाची जागा घेईल सांगता येत नाही. आता असचं काही झालं आहे. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्याबद्दल सध्या चर्चा रंगत आहे. रंगत असलेल्या चर्चेला कारण देखील तसं आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट' शोमध्ये शिल्पा परीक्षकाची भूमिका साकारत होती. पण आता तिने शोमधून काढता पाय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

शनिवारी शोमध्ये 'रिश्ते स्पेशल' एपिसोड प्रसारित झाला. एपिसोडमध्ये मलायका अरोरा आणि किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेर देखील आला होता. मात्र या एपिसोडमधून शिल्पा शेट्टी गायब होती.

शोमध्ये शिल्पा शेट्टी न दिसल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. शनिवारच्या एपिसोडला मलायका अरोरा आणि सिकंदर खेर यांच्यासह किरण खेर, बादशाह आणि मनोज मुनताशीर यांनी जज केले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिळालेल्या माहितीनुसार शिल्पाने शोला राम राम ठोकला आहे. यापूर्वी  'इंडियाज गॉट टॅलेंट' चे अनेक सीजनमध्ये मलायका अरोरा, किरण खेर आणि करण जोहर यांनी परीक्षकाची भूमिका साकारली. 

आता मलायका अरोरा शोमध्ये शिल्पाच्या जागी दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन कपूर मलायका अरोराला शोमध्ये सरप्राईज एन्ट्री घेताना दिसणार आहे. त्यामुळे मलायका अरोरासाठी हा एपिसोड खूप खास असेलस असं म्हणायला हरकत नाही.