जावई हवा तर असाच... विकीने कतरिनाच्या आईसाठी जे केलं, त्यानंतर तुम्हीही हेच म्हणाल

विकी-कतरिनाचे फॅमिली फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Updated: Mar 20, 2022, 01:07 PM IST
  जावई हवा तर असाच... विकीने कतरिनाच्या आईसाठी जे केलं, त्यानंतर तुम्हीही हेच म्हणाल title=

मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. नुकत्याच या जोडीला कुटुंबियांसोबत डिनरनंतर स्पॉट करण्यात आलं.

दोघेही फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसले. विकी-कतरिनाचे फॅमिली फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

विकी कौशल त्याच्या कुटुंबाची तसेच पत्नी कतरिना कैफच्या कुटुंबाची खूप काळजी घेतो. यादरम्यान विकी आपल्या सासूबाईंसोबत फोटो क्लीक करताना दिसला.

विकी त्यांच्या आईसोबत जसा वागतो, तितकाच प्रेमाने तो कतरिनाच्या आईसोबत देखील वागतो. आणि हे नुकतच दिसून आलं.

स्टाइलिश लुक में नजर आए Vicky-Katrina

विकीची संपुर्ण फॅमिली डिनरला गेली असताना त्यांच्यासोबत कतरिनाची आई देखील उपस्थित होती. यावेळी विकी सासूबाईंसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसला. त्यांनी एकत्र वेळ घालवला आणि मीडियासमोर पोज देत फॅमिली फोटो देखील क्लीक केला.

विकीचं कतरिनानंतर तिच्या फॅमिलीसोबत असलेलं गोड नातं आता दिसून येत आहे. त्याची कतरिनाच्या घरांच्यासोबत असलेली बॉण्डिंग सगळ्यांचे लक्षवेधून घेत आहे. या व्हिडिओंनंतर 'जावई हवा तर असाच..' असा सूर उमटत आहे.