डर्टी पिक्चरबद्दल तुला कल्पना होती का? पोलिसांच्या या प्रश्नावर शिल्पाने दिलं हे उत्तर

 पोर्नफिल्म प्रकरणी राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीही चौकशी करण्यात आली आहे.

Updated: Jul 24, 2021, 03:12 PM IST
डर्टी पिक्चरबद्दल तुला कल्पना होती का? पोलिसांच्या या प्रश्नावर शिल्पाने दिलं हे उत्तर title=

मुंबई : पोर्नफिल्म बनवल्याप्रकरणी बिझनेसमॅन राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा आणि त्याचा आयटी प्रमुख रयान थोर्प या दोघांना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान मुंबई क्राईम ब्रांचने शिल्पाच्या जुहूतील घरावर छापा टाकला. त्याचशिवाय शिल्पाची कसून चौकशीही करण्यात आली. 

शिल्पा शेट्टीला चौकशी दरम्यान, तुला या गोष्टींची माहिती होती का पोर्नफिल्म बनवण्यामध्ये राजचा हात आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शिल्पाने असं म्हटलंय आहे की, "तिला याची काहीही माहिती नव्हती. हॉटशॉट्सशी तिचा काही संबंध नाही. तर तिचा नवरा राज कुंद्रा कोणत्याही प्रकारच्या पॉर्न तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी नव्हता."

पोलिसांच्या चौकशीदरम्यान शिल्पा पुढे म्हणाते की, “हॉटशॉट्सच्या कंटेटबद्दल नेमकी माहिती नव्हती. तिने दावा केला की, हॉटशॉट्सशी काही संबंध नाही. त्याचप्रमाणे इरोटिका पॉर्नपेक्षा फार वेगळं आहे आणि तिचा नवरा राज कुंद्रा पोर्न फिल्म तयार करण्याच्या प्रक्रियेत नव्हता.”

एनएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या सूत्रांप्रमाणे, शिल्पा शेट्टीने क्राईम ब्रांचला दिलेल्या जबाबात राज कुंद्रा निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आता शिल्पाच्या बॅंक अकाऊंटचीही तपासणी करण्यात येणार आहे. कारण काही काळ राजच्या कंपनीत शिल्पा डायरेक्टर म्हणून काम करत होती.  तर दुसरीकडे राजने त्याच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. 

दरम्यान 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं. ही चौकशी सुमारे 2 तास चालली आणि त्यानंतर राज कुंद्राला रात्री अकरा वाजता अटक करण्यात आली. तर काल अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही कसून चौकशी करण्यात आली. राजला काल कोर्टात हजर केल्यानंतर अधिक चौकशीसाठी कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.