चित्रपट निर्मात्यानं थकवले पैसे, शशांक केतकरचा आरोप; FB Post मध्ये म्हणाला...

Shashank Ketkar : शशांक केतकरची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होते आहे. त्याच्या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यानं पुन्हा एकदा चित्रपट निर्मात्यानं आपले पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 2, 2023, 05:02 PM IST
चित्रपट निर्मात्यानं थकवले पैसे, शशांक केतकरचा आरोप; FB Post मध्ये म्हणाला...  title=
shashank ketkar post goes viral on instagram stating producer has not given him money

Shashank Ketkar : शशांक केतकर हा सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. परंतु सध्या त्याच्या एका पोस्टनं चांगलीच खळबळ माजवून दिली आहे. यावेळी त्यानं आपल्या फेसबुकवरून पोस्ट शेअर केली आहे. ज्यानं त्यानं एका चित्रपट निर्मात्यानं पैसे थकवल्याबद्दल लिहिलं आहे. त्यांचे आणि इतर काही कलाकारांचे पैसे त्यानं अजूनही दिलेले नाहीत याबद्दल त्यानं लिहिलं आहे. मागे अनेकदा अशाच लोकप्रिय मराठी टेलिव्हिजन निर्मात्यानं कलाकारांचे पैसे थकवल्याबद्दल त्या निर्मात्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्या निर्मात्याच्या कचाट्यात शशांकही अडकला होता. आता त्याची पुनरावृत्ती होते आहे की काय असे दिसते आहे. यावेळी शशांकनं भली मोठी पोस्ट लिहिली आहे. शशांक हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो आपली मतं आणि आपल्या अनेक गोष्टी या सोशल मीडियावरही शेअर करताना दिसतो. आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 

यावेळी नक्की शशांकनं आपल्या या पोस्टमधून काय लिहिलं आहे हे पाहुया. तो म्हणतो की, '' मी आणखी एका फसव्या प्रोडक्शन हाऊससोबत काम केलं आहे. त्या प्रोडक्शन हाऊसनं मला माझ्या कामाचे x, xx, xxx लाख रूपये देण्याचे वचन दिले होते सोबतच त्यांनी दिलेले काम मी त्यांच्या अपेक्षेनुसार पूर्ण केले आहे (डबिंग वगळता)

गेल्या अनेक महिन्यांपासून मी या फसव्या प्रोडक्शन हाऊसचा पाठपुरावा करतो आहे आणि ते लोक मला दरवेळी वेगवेगळी कारणं देत आहेत. मी एका मराठी चित्रपटाबद्दल बोलतोय. ज्यात आपल्याच सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांनी काम केले आहे. त्या मोठ्या कलाकारांना त्यांच्या देय रकमेची वाजवी टक्केवारी आधीच देण्यात आली आहे पण मला आणि त्याच टीममधील इतर अनेकांना अजून 20 टक्के रक्कमही मिळालेली नाही. माझ्या आणि निर्मात्यांमध्ये झालेल्या संवादाचे सर्व तपशील योग्य वेळी न्यूज आणि मीडिया चॅनेलशी शेअर केले जातील.

गमतीचा भाग हा आहे की एखाद्याकडे अॅक्टिंग स्किल्स नसतील तर त्याला आपण अभिनेता म्हणत नाही मग ज्याच्याकडे पैसा नाही त्याला प्रोड्युसर का म्हणतो आपण?”, असे शशांक केतकरने या पोस्टमध्ये म्हटले आहे.'' असं त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

ही पोस्ट लिहिताना त्यानं मध्ये मध्ये लाफिंग इमोजीही टाकले आहेत. त्यातून नक्की पोस्ट गमती आहे की खरी हे कळतं नाहीये. परंतु यावरून स्पष्ट कळते की हे प्रकरण गंभीरही असू शकते. यावेळी त्याला अनेक जण सपोर्ट करताना दिसत आहेत. यावेळी त्याची Scam 2003 ही सिरिजही प्रसिद्ध झाली आहे. त्याच्या प्रमोशननिमित्तानं त्यानं ही पोस्ट शेअर केली असण्याचीही शक्यता आहे.