बॉलिवूडमध्ये होणाऱ्या भेदभावावर खलनायक शरत सक्सेना यांचा धक्कादायक खुलासा

शरत सक्सेना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक बड्या चित्रपटांमध्ये काम केलं.

Updated: Jul 15, 2021, 11:01 PM IST
बॉलिवूडमध्ये होणाऱ्या भेदभावावर खलनायक शरत सक्सेना यांचा धक्कादायक खुलासा title=

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना गेल्या काही दिवसांपासून स्वत:ला इंडस्ट्रीत संदर्भात बोलके झाले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, बॉलिवूडमध्ये त्यांना 'पंचिंग बॅग' सारखी वागणूक मिळाली आहे. शरत सक्सेना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक बड्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण ते म्हणाले की, त्यांना प्रोफेशनल लाईफमध्ये कधीच ते स्थान मिळालं नाही. ज्याचा त्यांना हक्क होता. बॉलिवूडमधील जुन्या कलाकारांसाठी ज्या चांगल्या भूमिका येतात त्या अमिताभ बच्चन यांच्या झोतात जातात, असंही शरत म्हणाले. आता त्यांनी म्हटलं आहे की, रझा मुराद यांनी त्यांच्याबद्दल एक अफवा पसरविली होती, ज्यामुळे त्यांना बरेच प्रकल्प गमवावे लागले. गेल्या काही आठवड्यांपासून शरत सक्‍सेना वयाच्या 70व्या वर्षीही आपल्या फिजीकमुळे चर्चेत आहेत.

शारत सक्सेना यांनी मोठ्या पडद्यावरील बहुतेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. आपली व्यथा व्यक्त करताना त्यांनी असं म्हटलं आहे की, त्यांना चित्रपटात मुख्य खलनायक म्हणून कधीच कास्ट केलं गेलं नाही, परंतु ते नेहमी खलनायकाचा 'उजवा हात' म्हणून कायम दिसत राहिले. प्रत्येक चित्रपटात नायकाला मारहाण करणं हे त्याच्या भूमिकेचे भाग्य ठरलं आहे

'रझा मुराद यांनी अफवा पसरवली'
शरत म्हणाले की, 'आमिरने दिग्दर्शक-निर्मात्यांना माझं नाव सुचवलं होतं, तरीही कुणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. त्यांना सांगण्यात आलं की, मी चेन्नईला शिफ्ट झालो आहे. ही अफवा रझा मुराद यांनी पसरवली होती. मी आता मुंबईत राहत नाही, अशी अफवा त्यांनी माझ्याबद्दल पसरविली होती. यामुळेच चित्रपटाच्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला नाही.

शरत सक्सेना नुकतीच ओटीटीवर रिलीज झालेल्या विद्या बालनच्या 'शेरनी' या चित्रपटात दिसले होते. तो या चित्रपटात शिकारीची भूमिका साकारत आहे, जो वाघाला ठार मारण्यासाठी जंगलात आणण्यात आला होता. अमित मसुरकरचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच सोशल मीडियावर शरत सक्सेनाविषयी चर्चा सुरू झाली. वयाच्या 70 व्या वर्षीही त्याच्या भक्कम शरीराने सर्वांना वेड लावले. जिममधून त्याचे बरीच छायाचित्रेही समोर आली आणि नंतर मुलाखतींमध्ये शरतने आपल्या आयुष्यातील वेदना सांगितल्या.