एक्स बॉयफ्रेंडला पाहावणार नाहीत असे लिएंडर पेस आणि किम शर्माचे फोटो व्हायरल

'मोहब्बतें' चित्रपटाद्वारे लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री किम शर्मा आजकाल चर्चेत आहे. 

Updated: Jul 15, 2021, 10:48 PM IST
 एक्स बॉयफ्रेंडला पाहावणार नाहीत असे लिएंडर पेस आणि किम शर्माचे फोटो व्हायरल title=

मुंबई : 'मोहब्बतें' चित्रपटाद्वारे लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री किम शर्मा आजकाल चर्चेत आहे. तिचे गोव्यातले काही फोटो समोर आले आहेत. ज्यात ती टेनिसपटू लिअँडर पेससोबत दिसत आहे. फोटोत दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. त्यांच्यात चांगली केमिस्ट्री असल्याचंही दिसत आहे. यामुळे त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. मात्र अद्याप दोघांनीही या नात्याची अधिकृतपणे कबुली दिलेली नाही. या फोटोंवर आता किमचा एक्स बॉयफ्रेंन्ड हर्षवर्धन राणेची प्रतिक्रिया आली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आणि दोघांनीही याची कबुली दिली तर चांगलंच होईल. मात्र, यात जर सत्य असेल तर हे दोघंही हॉट कपल आहेत.मीडिया रिपोर्टनुसार किम आणि हर्षवर्धनच्या अफेअर्सची बातमी 2018मध्ये आली होती. दोघांनी एकमेकांना जवळपास २ वर्षे डेट केलं पण यानंतर या दोघांचे मार्ग वेगळे झाले. यामागील कारण कधीच उघड झालेलं नाही.

किमचं अली पुंजानी यांच्याशी लग्न झालं होतं, परंतु 2017 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. असं म्हणतात की, हर्षवर्धनच्या आधी फॅशन डिझायनर असलेल्या अर्जुन खन्नाला किमने डेट केलं होतं.