'पद्मावत' पाहून SRK रणवीरला म्हणाला ....

अनेक वाद विवादांचा अडथळा पार करून 'पद्मावत' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या नावामध्ये बदल करून चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. पण बॉक्सऑफिसवर 'पद्मावत'ने तुफान कमाई केली आहे.  

Updated: Feb 2, 2018, 10:29 PM IST
'पद्मावत' पाहून SRK रणवीरला म्हणाला ....   title=

मुंबई : अनेक वाद विवादांचा अडथळा पार करून 'पद्मावत' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या नावामध्ये बदल करून चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. पण बॉक्सऑफिसवर 'पद्मावत'ने तुफान कमाई केली आहे.  

अनेकांनी केलं कौतुक  

पद्मावत चित्रपटामध्ये शाहीद कपूर, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत आहेत. दीपिका राणी पद्मावतीच्या तर रणवीर अल्लाउद्दिज खिल्जी आनी शाहीद रवल रतन सिंह या महाराजाच्या भूमिकेत झळकला आहे. रणवीरने साकारलेला 'अल्लाउद्दीन खिल्जी' हा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या कामाचे प्रेक्षकांनी, समिक्षकांनी आणि बॉलिवूड स्टार्सनीदेखील कौतुक केले आहे.  

किंग खानने केले कौतुक

अभिनेता रणवीर सिंह याने ट्विटरवर किंग खानला चित्रपट पाहिला का ? असा प्रश्न केला होता.  शाहरूख खानने रणवीरला उत्तर देताना त्याचं कौतुकही केलं आहे. 

 

करोडोंची कमाई 

पद्मावतला काही संघटनांचा विरोध होता. मात्र तो झुगारून प्रेक्षकांनी 'पद्मावत'ला पाठिंबा दिला आहे. या चित्रपटाने चार दिवसातच 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.