‘त्या’ कारणाने शाहरूखला मागावी लागली मिथालीची माफी

बॉलिवूड किंग शाहरूख खान याने नुकतीच भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिथाली राज हिची माफी मागितली. शाहरूख खान हा ब-याच वर्षांनी टेलिव्हिजनवर पुन्हा येतोय.

Updated: Aug 24, 2017, 08:32 PM IST
‘त्या’ कारणाने शाहरूखला मागावी लागली मिथालीची माफी title=

मुंबई : बॉलिवूड किंग शाहरूख खान याने नुकतीच भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिथाली राज हिची माफी मागितली. शाहरूख खान हा ब-याच वर्षांनी टेलिव्हिजनवर पुन्हा येतोय.

त्याचा ‘टेड टॉक्स इंडिया’ नावाचा एक रिअ‍ॅलिटी शो सुरू होणार आहे. तुम्ही म्हणाल की, याचा आणि शाहरूखने मिथालीला माफी मागण्याचा काय संबंध?

तर शाहरूखचा हा नवा शो लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच एपिसोडमध्ये शाहरूखसोबत मिथाली राज आणि करण जोहर बघायला मिळणार आहे. या शो च्या पहिल्या एपिसोडच्या शूटिंगसाठी तिन्ही कलाकारांचं टायमिंग आधीच ठरलं होतं. या शूटिंगसाठी मिथाली वेळेवर पोहोचली. मात्र, शाहरूख आणि करण उशिरा आले. 

मिथाली शाहरूख आणि करणची बराचवेळ वाट बघावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूख साधारण ३ ते ४ तास उशिरा सेटवर पोहोचले. त्यामुळे मिथाली टातकळत बसावं लागलं. याकारणानेच शाहरूखने मिथालीला माफी मागितली. 

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरूखने सेटवर पोहोचल्यावर मिथालीची माफी मागितली आणि उशिर का झाला याचे कारणही सांगितले. त्यानंतर या एपिसोडचं शूटिंग सुरू झालं. या पहिल्या एपिसोडची थीम ‘बदलते रिश्ते’ अशी आहे. शाहरूखच्या सिनेमाबाबत सांगायचं तर तो आनंद राज यांच्या सिनेमात दिसणार असून यात तो कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मासोबत दिसणार आहे.