मुंबई : शाहिर शेखच्या उत्तम अभिनायाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. शाहिरने अल्प वयापासून अभिनयाची सुरूवात केली होती. ‘क्या मस्त है लाईफ’ शाहिरची पहिली मालिका कॉलेज लाईफवरची असून शाहिर अनेक मालिकेत काम केले आहे. ‘कुछ रंग प्यार के ऐसे ही’, ‘नव्या’,’ये रिश्ते है प्यार के’ ही विवाह आणि कौटुंबिक संबंध या विषयांवरील त्यांच्या मालिका आल्या आहेत. भारतातच नव्हे तर देशाबाहेरील मालिकेत आणि चित्रपटात शाहिरने काम केले आहे. शाहिर भारतात नाही तर दुसऱ्या देशातही प्रेक्षकांचा लाडका आहे इंडोनेशियामध्ये शाहिरचे चाहत्ये पुष्कळ आहे. शाहिरच्या देखण्या व्यक्तीमत्वामुळे आणि अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. शिवाय तो कुठल्याही मालिकेच्या सेटवर तो सर्वाचा लाडका होऊ जातो. शाहिरचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होत आहे. त्याची आगामी येणारा चित्रपट ‘मेन्टल है क्या ?’हा चित्रपट येत आहे. शाहिरने याआधी इंडोनेशियन चित्रपटात काम केले आहे. काही दिवसापूर्वीच शाहिरचा वाढदिवस साजरा करण्यात आल होता. त्यावेळी त्याच्या काही फॅमेली फॅन्सनी त्याला अनपेक्षीत भेट दिली. शाहिर शेखला पर्यावरणावर खूप प्रेम आहे. त्यामुळे शाहिरला त्यांच्या फॅन्सनी पश्चिम बंग्लालमधील सुंदरबन राष्ट्रीय उद्यानालगतचा भूखंड गिफ्ट म्हणून दिला आहे.
या भूखंडावर ‘ट्रिज फॉर टायगर’ या मोहिमेअंतर्गत 50 रोपटे लावली गेली. शाहिरनी ही गोष्ट ऐकल्यावर तो एकदम आनंदी झाला आणि त्या याबद्दल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली. शाहिरनी पोस्टमध्ये लिहले आहे, जीवनात तुमच्यासारखे मित्र आणि शुभचिंतक असल्यामुळे मी स्वत:ला खूप नशिबवान समजतो आणि आनंदी समजतो. माझ्या पाठीशी कायम उभे राहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असे शाहिरने त्यांच्या पोस्टमध्ये लिहले आहे. शाहिर ’ये रिश्ते है प्यार के’सेटवर खुप मस्करी करत असतो त्यामुळे सेटवरील वातावरन आनंदी आणि उत्साही असते. पुष्कळ वेळा त्याच्या थट्टेची बळी मालिकेत मिष्टीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिया शर्माच ठरते. मात्र तिला शाहीरचा स्वभाव आवडतो. रिया सुद्धा शाहिरची फिरकी घेते आणि ती त्याला चिडवितेही.