मुंबई : Drugs case प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान, याच्या अडचणी कुठं कमी झाल्याचं चित्र होतं. पण, आता मात्र ते चित्र धुसर होण्याची शक्यता आहे. कारण, सूत्रांच्या माहितीनुसार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच (NCB) त्याच्या जामीनाला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याच्या विचारात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनला 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला होता. जवळपास 25 दिवसांनंतर त्याची कारागृहातून सुटका झाली होती.
1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यासह काही अटींवर त्याला कारागृहातून सोडण्यात आलं होतं. ज्यावर आता एनसीबी काही कायदेशीर तरतुदी विचारात घेत आहे.
असं म्हटलं जात आहे की, लवकरच एनसीबी आर्यनच्या याचिकेला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल.
एनसीबी आता आर्यनसाठी जाळ विणत असल्याच्या चर्चा समोर आल्या खऱ्या, तर या चर्चा नेमक्या कोणत्या आणि खरंच आर्यन पुन्हा कायद्याच्या कचाट्याच येतो का यावरच सर्वांचं लक्ष आहे.
NCB समोर आर्यन हजर...
19 नोव्हेंबरला आर्यननं एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थिती लावली होती. आर्यनची ही तिसरी आठवडी हजेरी होती.
एनसीबी अधिकाऱ्यांसमोर आल्यानंतर आर्यन, दिल्लीहून आलेल्या यंत्रणेच्या विशेष तपास पथकासमोरही हजर झाला होता.