Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या चार्मसाठी ओळखला जातो. इतकंच काय तर त्याची भाषा, त्याची बोलण्याची पद्धत याचे तर लाखो चाहते आहेत. शाहरुखचे तर लाखो चाहते आहेत. पण शाहरुखला एकदा एका चाहतीसोबत भेटतानाचा असा किस्सा सांगितल्या ज्यानंतर सगळ्यांना फक्त आश्चर्य झालं नाही तर हसू अनावर झालं आहे. खरंतर शाहरुखला एका चाहतीनं अभिनेता अक्षय कुमार समजले होते. इतकंच काय तर ती चाहती शाहरुखला आय लव्ह यू अक्षय म्हणाली होती. त्याविषयी शाहरुखनं स्वत: सांगितले.
शाहरुखनं 2016 साली दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. शाहरुखसोबत ही घटना 'परदेस' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी झाली होती. त्यावेळी गौरी खानचं मिस्कॅरेज म्हणजेच गर्भपात झालं होतं. त्यावेळी ही बातमी कळताच शाहरुख त्याची शूटिंग सोडत लगेच गौरीकडे येण्यास निघाला होता. जेणेकरून तो लवकर गौरी जवळ पोहोचू शकेल. शाहरुख शूटिंग सुरु होती त्या ठिकाणाहून लवकरात लवकर विमानतळावर पोहोचला होता. तर हा किस्सा शाहरुखसोबत विमानतळावरच झाला होता.
हा किस्सा सांगत शाहरुख म्हणाला त्याला टर्मिनल बदलायचे होते त्यामुळे तो रस्त्यावरून जात होता. शाहरुख इतक्या घाईत होता की त्याच्या बॅगचं हॅन्डल तुटलं आणि तो चिंतेत विमानतळावर धावत होता. त्यावेळी मागून शाहरुखला मागूण कोणी आवाज दिल्याचे ऐकायला आले आला की ती व्यक्ती त्याच्याकडून ऑटोग्राफ मागत आहे. त्यावेळी असं असतानाही शाहरुख त्या चाहतीला ऑटोग्राफ देण्यासाठी थांबला. त्यावेळी ती महिला चाहती शाहरुखला म्हणाली की ती त्याची खूप मोठी चाहती आहे. अक्षय आय लव्ह यू.
त्या महिलेनं शाहरुखला अक्षय समजले आणि ती अक्षयची चाहती होती. हे पाहता आता शाहरुखची रिअॅक्शन काय असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण शाहरुखनं तिला वाईट वाटायला नको म्हणून अक्षयच्या नावानं ऑटोग्राफ दिला होता.
हेही वाचा : मराठमोळा शिव ठाकरे 'खतरों के खिलाडी' च्या एका एपिसोडसाठी घेणार लाखोंचं मानधन!
दरम्यान, नुकताच शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तर थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखच्या पठाणनं एकामागे एक असे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले होते. शाहरुख हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दरम्यान, लवकरच शाहरुख 'जवान' या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय त्याच्याकडे 'डंकी' हा चित्रपट देखील आहे.