New Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नवीन संसद भवनाचे (new parliament building) उद्घाटन केले आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन वैदिक मंत्रोच्चारात करण्यात आले आहे. मात्र पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे, असा आग्रह विरोधकांनी धरला होता. या मुद्द्यावरूनच 20 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर दुसरीकडे अनेकांनी संसदेच्या नव्या इमारतीचे कौतुक केले आहे. यामध्ये बॉलिवुड सेलिब्रिटी देखील मागे नाहीत. अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) पासून अक्षय कुमारपर्यंत सर्वांना या इमारतीच्या निमित्ताने सरकारचं कौतुक केले आहे.
शाहरुख खानने नवीन संसद भवनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखने आपला आवाज दिला आहे. नव्या संसदेची खासियत आणि भव्यतेचे या व्हिडिओमध्ये वर्णन करण्यात आले आहे. हा व्हिडिओ शाहरुखने ट्विटरवर शेअर केला आहे. "नरेंद्र मोदीजी या महान राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि आपल्या देशवासीयांच्या विविधतेचे रक्षण करणाऱ्या लोकांसाठी किती छान नवीन घर आहे. नवीन भारतासाठी, देशाच्या अभिमानाचे जुने स्वप्न असलेले नवीन संसद भवन आहे. जय हिंद!," असे शाहरुखने म्हटलं आहे.
काय म्हटंलय शाहरुख खानने?
"भारताचे नवीन संसद भवन. आमच्या आशेचे नवीन घर. ज्यांनी आपली राज्यघटना तयार केली त्यांच्यासाठी एक घर जिथे 140 कोटी भारतीय एक कुटुंब आहेत. हे नवीन घर इतकं मोठं असायला हवं की देशातील प्रत्येक प्रांत, प्रदेश, गाव, शहरासाठी जागा मिळायला हवी. हे घर इतके व्यापक होवो की, देशातील प्रत्येक जाती-वर्णातील प्रत्येक धर्मावर प्रेम करता येईल. त्याचे डोळे इतके खोल असावेत की ते देशातील प्रत्येक नागरिक पाहू शकतील. इथे सत्यमेव जयतेची घोषणा नाही, श्रद्धा असली पाहिजे. इथे हत्ती, घोडा, सिंह आणि अशोक चक्राचा स्तंभ हा आपला इतिहास असावा. शरीराला जसा आत्मा असतो, तशीच देशात संसद आहे. देशाची लोकशाही आपल्या नवीन घरात अधिक मजबूत व्हावी अशी मी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि बंधुत्वाला प्रोत्साहन मिळो. देशाच्या नव्या संसदेने असे भविष्य घडवले पाहिजे की ज्यात लोकांबद्दल सहानुभूती असेल. नवीन भारताचे नवीन संसद भवन. पण देशाची शान वाढवण्याच्या जुन्या स्वप्नांसहच," असे शाहरुखने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी केले कौतुक
शाहरुखचे हे ट्विट पंतप्रधान मोदींनीही रिट्विट केले. सुंदर अभिव्यक्ती! नवीन संसद भवन हे लोकशाही शक्ती आणि प्रगतीचे प्रतीक आहे. त्यात परंपरेला आधुनिकतेची जोड दिली आहे, असे शाहरुखचे कौतुक करताना पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
Beautifully expressed!
The new Parliament building is a symbol of democratic strength and progress. It blends tradition with modernity. #MyParliamentMyPride https://t.co/Z1K1nyjA1X
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2023
दरम्यान, अक्षय कुमारने ट्विटरवर या नवीन इमारतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'संसदेची ही भव्य नवी इमारत पाहणे अभिमानास्पद आहे. ते भारताच्या विकास कथेचे प्रतिकात्मक प्रतीक म्हणून कायम राहो.