Shah Rukh Khan and Suhana Khan Film: शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान आता लवकरच 'द आर्चिज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. परंतु आता समोर आलेल्या रिपोर्टनुसार असे कळते आहे की लवकरच शाहरूख खान आणि त्याची लेक सुहाना खान हे एका चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. मागच्या वर्षी 'द आर्चिज' या चित्रपटाची घोषणा झाली होती. एकाचवेळी या चित्रपटातून तीन स्टारकीड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. त्यामुळे त्यांचीच एकच चर्चा सुरू झाली होती. त्यावरून बॉलिवूडवर परत टीकास्त्र सुरू करण्यात आले होते.
बॉलिवूडमध्ये फक्त स्टारकीड्सनाच जागा आहे त्यांनाच कायम पुढे केले जाते अशी टिप्पणी यावेळी झालेली पाहायला मिळाली. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझरही आला आहे. 1964 साली भारत इतका प्रगत होता का ज्याप्रमाणे टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
परंतु आता या चित्रपटाच्या चर्चांमध्ये आणखीन एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे लवकरच शाहरूख खान आणि सुहाना खान हे एकत्र एकाच चित्रपटातून कामं करणार आहेत. 'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार अशी माहिती कळते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष करणार असल्याचे कळते आहे. समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते आहे की या चित्रपटाचे प्री - प्रॉडक्शन सुरू झाले आहे. अद्याप तरी याविषयीची फारशी माहिती समोर आलेली नाही. सोबतच या चित्रपटात नक्की कोणते कलाकार असतील तसेच या चित्रपटाचा नक्की विषय कोणता असेल याबाबतही अद्याप कसलीच माहिती नाही. परंतु हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हा चित्रपट शाहरूख खानच्या रेड चिलिज एन्टरटेंनमेंट आणि सिद्धार्थ आनंदच्या मार्फ्लिक्स पिक्चरद्वारे निर्माण केला जाणार आहे.
हेही वाचा - ''मी डेटॉलनं गुळण्या केल्या...'' नीना गुप्ता यांनी सांगितला पहिल्या किसिंग सीनचा अनुभव
पुढच्यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.'बदला', 'कहानी', 'कहानी 2' या चित्रपटाचे लोकप्रिय दिग्दर्शक सुजॉय घोष हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमातून सुहाना खान आपला पहिला थिएटर डेब्यू करेल असे कळते आहे. 'द आर्चिज' मधून ती नेटफ्लिक्सवर आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. शाहरूख खानच्या येत्या काही चित्रपटानंतर म्हणजेच 2024 ला अर्थात पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी माहिती कळते आहे.
त्यामुळे आता शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट चांगलीच पर्वणी ठरणार आहे. अर्थात शाहरूख खानचा 'जवान' आणि 'धुनकी' हे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे सुहाना खान आणि शाहरूख खानच्या प्रेक्षकांसाठी ही चांगलीच पर्वणी आहे.