…जेव्हा जया भादुरीला डेट करायचे बिग बी, मला पण घेऊन जायचे; ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितला किस्सा

Farida Jalal on Amitabh Bachchan Jaya Bachchan Dating: सध्या चर्चा आहे ती म्हणजे फरीदा जलाल आणि अमिताभ बच्चन, जया बच्चन यांच्या मैत्रीबद्दल. यावेळी फरीदा जलाल यांनी आपल्या आणि त्यांच्या मैत्रीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. तुम्हाला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या डेटिंगचा एक किस्सा जाणून घ्यायचा आहे का? 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 20, 2023, 02:02 PM IST
…जेव्हा जया भादुरीला डेट करायचे बिग बी, मला पण घेऊन जायचे; ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितला किस्सा title=
senior actress farida jalal open up about her friendship with amitabh bachchan and jaya bachchan

Farida Jalal on Amitabh Bachchan Jaya Bachchan Dating: बॉलिवूडमध्ये लोकप्रिय जोड्या आहेत हे आपल्याला तर माहितीच आहे. त्यातून असेही अनेक कलाकार आहेत ज्यांची मैत्री ही बरीच वर्षे टिकून आहे. त्यामुळे त्यांचीही अनेकदा चर्चा रंगलेली असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मैत्रीबद्दल सांगणार आहोत. ज्यांची मैत्री ही फार जुनी आहे त्यातून त्यांच्या गाठीभेटी होत नसल्या तरीसुद्धा त्यांची मैत्री ही आजही कायम आहे. त्यामुळे त्यांचीही अनेकदा चर्चा असते आज पुन्हा एकदा त्यांची चर्चा आहे. आम्ही ज्यांच्याबद्दल बोलतोय ते आहेत फरीदा जलाल व अमिताभ बच्चन आणि जया बच्चन. त्यांची मैत्रीही फार जूनी आहे. त्यांनी एकत्र अनेक चित्रपटांतूनही कामं केली आहेत.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत फरीदा जलाल यांनी आपल्या आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीवर भाष्य केले आहे. अमिताभ बच्चन या व्यक्तिमत्त्वाच्या आपण सर्वच जणं प्रेमात आहोत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलली असते. तुम्हाला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या डेटिंग दरम्यानचा एक किस्सा जाणून घ्यायचा आहे का खुद्द फरीदा जलाल यांनीच हा किस्सा सांगितला आहे. चला तर मग जाणून घेऊया हा इंटरेस्टिंग किस्सा.

नुकत्याच 'राजश्री अनप्लग्ड'ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे दोघजणं जेव्हा एकमेकांना डेट करत होते तेव्हा फरीदा जलाल या त्यांच्यासोबत लॉन्ग ड्राईव्ह आणि कॉफी प्यायला जायच्या. तेव्हा त्यांच्या पाली हिलच्या घरी येऊन फरीदा जलाल यांना लॉन्ग ड्राईव्हला आणि कॉफी प्यायला घेऊन जायचे. परंतु नक्की हा किस्सा काय होता हे आपण या लेखातून जाणून घेऊया. 

हेही वाचा : लाडक्या भाचीला कडेवर घेऊन सलमान खाननं केली गणपती बाप्पांची आरती, पाहा VIDEO

माझं अमितजींबरोबर खूप जुनं नातं आहे आणि त्याहीपेक्षा जुनं नातं हे जया यांच्याशी आहे. आजही आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांना जरी वारंवार भेटत नसलो तरीही त्याचा आमच्या एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमावर काहीच परिणाम झाला नाही, असं त्या यावेळी म्हणाल्या.  त्यांच्या मैत्रीबद्दल आणखीन बोलताना म्हणाल्या की, ''तेव्हा आमचा एक मोठा ग्रुप होता आणि आम्ही नेहमी भेटायचो. मला आठवतंय जेव्हा अमिताभ आणि जया एकमेकांना डेट करत होते.तेव्हा ते दोघं मला रात्री पाली हिल्समधील माझ्या घरून घेऊन जायचे आणि आम्ही ताज येथे कॉफी घेण्यासाठी ड्राईव्हला जायचो.