दुसऱ्या दिवशी 'साहो'ची दमदार कमाई

 चित्रपटाच्या कमाईचा आकडा सतत चढत्याक्रमावर असल्याचे स्पष्ट होत आहे. 

Updated: Sep 1, 2019, 04:07 PM IST
दुसऱ्या दिवशी 'साहो'ची दमदार कमाई  title=

मुंबई : सुजित दिग्दर्शित 'साहो' चित्रपटाची उत्सुकता सुरुवातीपासूनच पाहायला मिळाली होती. बुधवारी यूएईमध्ये चित्रपटाचे स्क्रिनींग ठेवण्यात आले होते. एका हिंदी फिल्म डिस्ट्रीब्यूटरने चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या नंतरही चित्रपटाच्या लोकप्रियतेत काही बदल झाल्याचे दिसून येत नाही. चित्रपटाच्या कमाईचा आकडा सतत चढत्याक्रमावर असल्याचे स्पष्ट होत आहे.   

प्रभासची हिंदी डबिंग, अभिनेत्री श्रद्धा कपूरची कामगिरी, चित्रपटाच्या कथेला रटाळ सांगत 'साहो'वर टीका करण्यात येत होती. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाने तब्बल २०५ कोटींचा गल्ला जमा केला.  

जगभरात जवळपास १० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला साकारण्यासाठी जवळपास ३५० कोटींचा निर्मितीखर्च करण्यात आला. अशा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा १०० कोटींचा आकडा ओलांडला. येत्या काळात प्रभासचा 'साहो' किती कोटींपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.