'ही' आहे जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री!

लॉस्ट इन ट्रान्सलेसनची अभिनेत्री स्कारलेट जॉनसनला फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून नावाजले आहे.

Updated: Aug 25, 2018, 12:42 PM IST
'ही' आहे जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री! title=

मुंबई : लॉस्ट इन ट्रान्सलेसनची अभिनेत्री स्कारलेट जॉनसनला फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून नावाजले आहे. द गार्जियन हॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, या ३३ वर्षीय अभिनेत्रीने १ जून २०१७ ते १ जून २०१८ या दरम्यान ४.०५ कोटी डॉलची कमाई केली. ही कमाई तिच्या गत वर्षाच्या तुलनेत चौप्पट आहे.

या कमाईने तिने अभिनेत्री एंजेलिना जोलीलाही मागे टाकले आहे. आता एंजेलिना दुसऱ्या क्रमांकावर असून तिची कमाई एकूण २.८ कोटी डॉलर इतकी आहे. तर अभिनेत्री जेनिफर एनिस्टनची कमाई १.९८ कोटी डॉलर असून ती तिसऱ्या स्थानावर आहे. 

स्कारलेटची कमाई गेल्यावर्षीच्या अभिनेत्यांच्या तुलनेत कमी होती. २०१७ मध्ये मार्क वालबर्ग यांची कमाई ६.८ कोटी असून तो सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला आहे.
स्कारलेटने यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'एवेंजर्स : इनफिनिटी वार' या सिनेमात अश्वेत विधवाची भूमिका साकारली आहे. त्याचा नवा सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित होईल.