'अनीता भाभी' ला पिंक बिकिनीत पाहून नेटकरी हैराण, म्हणाले "मिस वर्ल्डमध्ये सहभागी हो..."

Saumya Tandon Bold Photo: अनिता भाभी उर्फी सौम्या टंडननं सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहता अनेकांनी तिला भन्नाट कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचा हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 15, 2023, 07:04 PM IST
'अनीता भाभी' ला पिंक बिकिनीत पाहून नेटकरी हैराण, म्हणाले "मिस वर्ल्डमध्ये सहभागी हो..." title=
(Photo Credit : Social Media)

Saumya Tandon : छोट्या पडद्यावरील लोकपप्रिया मालिका 'भाबीजी घर पर हैं!' मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन ही चांगलीच फेमस आहे. सौम्याचे लाखो चाहते आहेत. सौम्यानं ही मालिका अर्धवट सोडून काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला. तिच्या या निर्णयानंतर तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. त्यानंतर तिने कोणताही नवीन टीव्ही शो साइन केला नसला तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड असते.

सौम्या तिच्या इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे, जिथे ती अनेकदा बोल्ड अँड ब्युटीफुल म्हणतात ना तसे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अलीकडेच, तिने तिच्या सुट्टीतील बिकि्नीतील काही फोटो शेअर केले होते. या फोटोत सौम्यानं गुलाबी रंगाची बिकीनी परिधान केली होती. तिचा हा बिकिनी अवतार पाहून चाहते तिच्यावर कॉमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांनी दिला सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्याचा सल्ला 

सौम्याचे चाहते सौम्याच्या या फोटो खाली मजेदार कमेंट करताना दिसत आहेत. सौम्या टंडन मिस वर्ल्डमध्ये सहभागी झाली तर ती विजेती होईल, असे काही चाहत्यांचे म्हणणे आहे. तर काही वात्रट चाहत्यांनी त्यांना भाभीजी मधील एक पेंटर 'तिवारी जी' यांच्या नावाने चिडवायला सुरुवात केली. 'भाबीजी घर पे है ?!' या मालिकेत मनमोहन तिवारी (रोहिताश्व गौर) या मालिकेतील भाभीजी म्हणजेच सौम्य टंडन यांचावर फिदा आहेत असा दाखवण्यात आलं होतं. हाच संदर्भ घेऊन फॅन्स सौम्याला चिडवताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता काय करते सौम्या टंडन ?

अभिनयातून ब्रेक घेत सौम्या टंडन देखील आता व्यवसाय करत आहे. 2016 मध्ये तिनं राइड शेअरिंग या अॅप  मध्ये गुंतवणूक केली होती. आता मालिक सोडून सौम्या विविध फॉरमॅटमध्ये काम करत आहे. सोशल मीडियावर जाहिरातीशिवाय ती अँकरिंगही करते. याशिवाय सौम्या ट्रॅव्हलिंगचा देखल आनंद लुटताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : "एक-दोन नव्हे तर चक्क 7 वेळा...", Nawazuddin Siddiqui सोबत इंटिमेट सीन दिल्यानंतर खूप रडली कुबरा सैत?

सौम्या टंडनने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंग आणि होस्टिंगपासून केली होती. 'जब वी मेट' या चित्रपटातही ती बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूरच्या लहान बहिणीच्या भूमिकेत दिसली होती. 'भाभीजी घर पार है''  व्यतिरिक्त सौम्या एका अफगाणी मालिकेतही दिसली होती.