Sara Ali Khan Troll for Visiting Temple : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सध्या तिचा आगामी चित्रपट विकी कौशलच्या 'जरा हटके, जरा बचके' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघेही वेगवेगळ्या शहरांमध्ये जात आहेत. दरम्यान, नुकतेच सारा आणि विकी हे दोघे ही लखनऊमध्ये गेल्यानंतर तिथल्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी पोहोचले. त्यावेळी साराला तिथे शिवाचा आशीर्वाद घेताना पाहूण अनेकांनी साराला ट्रोल केले आहे. त्यांना तिचे मंदिरात जाणे पसंत आलेले नाही. तेच तिच्या ट्रोलिंगचं कारण ठरले आहे.
सारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सारा आणि विकी हे मंदिराच्या गाभाऱ्यात असून महादेवाची प्रार्थना प्रार्थना करताना दिसत आहे. सारानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर विकीनं ऑकर रंगाचं शर्ट परिधान केलं आहे. मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर तिनं ही पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सारानं कॅप्शन दिलं की ‘जय भोलेनाथ’. सारानं सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
साराच्या या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, "तुझ्यावर नीट संस्कार झाले नाहीत वाटतं त्यामुळेच तू मंदिरात जाऊन प्रार्थना करतेस." तर दुसरा नेटकरी म्हणाला, "तुझे वडील मुस्लिम आहेत आणि मंदिरात जाऊन पूजा करते. लाज वाटते, जर तुला चांगले संस्कार मिळाले असते तर असं झालं नसतं." तिसरा नेटकरी म्हणाला, "तुझं नाव बदलं मग. आणखी एक नेटकरी म्हणाला, हा खरा देव आहे?" दुसरा नेटकरी म्हणाला, "लाज वाटते, तू एक मुस्लिम आहेस. अल्लाहला तर घाबर." तिसरा नेटकरी म्हणाला, "हिंदू कोणत्याही मुर्तीची पूजा का करतात जेव्हा त्यांच्या ग्रंथांमध्ये म्हटलं आहे की कोणता देव नक्की कसा दिसतो हे माहित नाही." एक नेटकरी म्हणाला, "ही पहिली मुस्लिम मुलगी आहे जी हिंदू धर्माला मानते आणि तिचा देवांवर देखील विश्वास आहे."
सविस्तर वाचा : बड्या सेलिब्रिटींना Urfi Javed नं दाखवला आरसा; कुस्तीपटूंना पाठींबा देत म्हणाली...
दरम्यान, सारा आणि विकी कौशल यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा 2 जून रोदी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एका जोडप्याच्या लव्ह रिलेशनशिपविषयी आणि त्यांच्या घटस्फोटाविषयी दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात सारानं सोम्या ही भूमिका साकारत आहे तर विकी हा कपिलही भूमिका साकारताना दिसणार आहे.