Sanjeeda Shaikh Dating : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक संजीदा शेख आहे. संजीदाला प्रेक्षक तिच्या 'कयामत' आणि 'इश्क का रंग सफेद' या मालिकांसाठी ओळखला जातो. संजीदा शेख ही तिच्या वेगवेगळ्या मालिकांसाठी ओळखली जाते. संजीदा फक्त तिच्या मालिकांसाठी नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहते. आता देखील तिचं चर्चेत येण्याचं कारण हे कोणतीही मालिका नाही तर तिचं खासगी आयुष्य आहे. संजीदा बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
संजीदा आणि हर्षवर्धन राणे हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. त्या दोघांविषयी अशा चर्चा का सुरु झाल्या आहेत. त्याचं एक कारण म्हणजे सोशल मीडियावर त्या दोघांचे व्हायरल होणारे फोटो. त्या दोघांच्या जंगली सफारीचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. नेटकरी त्या दोघांच्या व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये साम्य शोधत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी तर दावा केला आहे की ते दोघं एकत्र जंगल सफारी करत असून सुट्टीचा आनंद घेत आहेत. पण त्या दोघांनी या बातमीवर दुजोरा दिलेला नाही.
खरंतर गेल्या काही महिन्यांपासून ते दोघे इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जंगल सफारीचे काही फोटो शेअर करत आहेत. त्या फोटोंमधून नेटकऱ्यांनी साम्य शोधले आहेत. छोट्या छोट्या गोष्टी नेटकऱ्यांनी शोधून काढल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दोघांच्या फोटोमध्ये असलेलं दिसून येणार साम्य म्हणजे त्यांच बॅकग्राऊंड. त्या फोटोंमध्ये ते ज्या जीपमध्ये बसले आहेत ती सेम आहे. फक्त ते दोघं शेजारच्या सीटवर बसल्याचे दिसत आहे. संजीदानं शेअर केलेल्या फोटोत ती तिच्या मुलीसोबत दिसत आहे. तर हर्षवर्धन हा एकटा बसला असून त्याचा हा कॅन्डिड फोटो आहे.
दरम्यान, हर्षवर्धननं संजीदासोबत त्याचं रुमर्ड रिलेशनशिपवर काही बोलण्यावर नकार दिला. पण त्यानं एका संस्थेला म्हटलं की त्याला त्याच्या खासगी आयुष्यावर सुरु असलेल्या चर्चांची काहीही चिंता नाही. तो म्हणाला की पत्रकार माझ्याविषयी काहीही लिहू शकतात. जेव्हा देखील मी त्यांना भेटेन तेव्हा मी त्यांना मिठी मारेन.
हेही वाचा : आईच्या वयाच्या व्यक्तीशी लग्न... 8 वर्षात घटस्फोट, वैवाहिक आयुष्याविषयी अभिनेत्रीचा मोठा खुलासा
संजीदाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर तिचं आणि अभिनेता आमिर अली याचा घटस्फोट झाला आहे. 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'क्या दिल में है' च्या शूटिंग दरम्यान, ते दोघं जवळ आले होते. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2012 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. तर लग्नाच्या नऊ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्या दोघांना एक मुलगी असून सरोगसीच्या मदतीनं ते आई-वडील झाले आहेत.