Shobhita Dhulipala's Father was pissed during her Wedding : दाक्षिणात्य अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरस झाले. दोघांनी 4 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये अन्नापूर्णा या अक्किनेनी कुटुंबाच्या स्टुडियोमध्ये सप्तपदी घेतल्या. नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न झालं. त्याआधी त्यानं समांथा रुथ प्रभूसोबत लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या काही वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. आता नागा चैतन्य आणि शोभितानं एकत्र नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. त्या दोघांना त्यांचे चाहते शुभेच्छा देत आहेत. तर या सगळ्यात शोभिताची बहीण समांथा धुलिपालानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. त्यापैकी एका फोटोला शेअर करत समांथानं खुलासा केला की तिचे वडील हे चिडले होते.
समांथा धुलिपालानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता दिसत नाही आहे. त्या व्हिडीओत शोभिताचे आई-वडील हे लग्नाच्या विधी करताना दिसत आहेत. आई आनंदी आहे, तर दुसरीकडे वडील हे चिडले आहे. त्यांच्या मागेच समांथा धुलिपाला ही बसली होती आणि ते कॅमेऱ्याकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव देत होती. त्याशिवाय एक फोटो देखील तिनं स्टोरीवर शेअर केला आहे. हा शेअर करत तिनं कॅप्शन दिलं की माझे वडील चिडले होते.
नागा चैतन्य आणि शोभिताच्या लव स्टोरी विषयी बोलायचे झाले तर ते दोघं दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. त्या दोघांच्या लग्नाला कुटुंबातील लोकांनी आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. चिरंजीवी ते महेश बाबू, राणा दग्गूबाती, नानी, पीवी सिंधु, एसएस राजामौली, एनटीआर, अल्लू अर्जुन, आणि राम चरण अशा अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी हजेरी लावली होती.
हेही वाचा : श्रीदेवीनंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्राचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू! Live Concert आधीच...
लग्नानंतर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण अक्किनेनी कुटुंब पाहायला मिळालं. त्याचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.