सलमानने बर्फावर साकारली कतरिना...

सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट येऊ घातला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 2, 2017, 08:56 AM IST
सलमानने बर्फावर साकारली कतरिना... title=

मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट येऊ घातला आहे.

त्याचे जोरदार प्रमोशन चालू आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ‘स्वॅग से स्वागत’हे गाणे प्रदर्शित झाले. तसेच चित्रपटाची टीम वेळोवेळी खास फोटोज शेअर करत असल्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे. 

कतरिनाचे सुंदर पेंटिंग

नुकतेच निर्मात्यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत झोया म्हणजेच कतरिना कैफचे बर्फावर सुंदर पेंटिंग काढलेले दिसते. चित्रपटात तिचे हे पेंटिंग दुसरे कोणी नाही तर खुद्द सलमान खाननेच काढलेले असते. या फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, ‘टायगरने बर्फावर झोयाचे पेंटिंग काढून जणू तो क्षणच गोठवला.’

प्रदर्शनाच्या वाटेवर

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’ चा सिक्वल आहे. हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होईल.