मुंबई : सलमान खान आणि प्रियंका चोप्रा स्टारर भारत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सिनेमातून प्रियंका तब्बल ३ वर्षांनी बॉलिवूडमध्ये कॅमबॅक करणार आहे. अलिकडेचा या सिनेमातील दबंग खानचा लूक समोर आला.
कोरियन फिल्म 'ओड टू माई फादर'चा भारत हा हिंदी रिमेक आहे. याचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर करत आहेत. या सिनेमात सलमानचे विविध लूक पाहायला मिळणार आहेत. आताच सलमानची पहिली झलक त्याचे डिजाईनर ऐश्ले रेबेलोने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
यात सलमान खान काळ्या रंगाच्या टी-शर्टसोबत जॅकेटमध्ये दिसत आहे. याचबरोबर शूटिंगदरम्यानचे प्रियंकाचे काही फोटोजही लीक झाले आहेत. यात प्रियंका ब्लॅक ट्राऊजर आणि व्हाईट शर्टमध्ये दिसत आहे.
या सिनेमातून सलमान-प्रियंका ही जोडी तब्बल १० वर्षांनंतर एकत्र येणार आहे. यापूर्वी २००८ मध्ये आलेल्या गॉड तुसी ग्रेट हो मध्ये दोघे एकत्र दिसले होते.
अली अब्बास जाफर यांनी सलमानच्या सुलतान, टायगर झिंदा है सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. तर प्रियंकाचा गुंडे सिनेमा देखील त्यांनीच दिग्दर्शित केला होता.