आगामी वर्षात चाहत्यांना सलमानकडून जबरदस्त 'ईदी'

सलमानच्या चित्रपटाची घोषणा...

Updated: Oct 25, 2019, 08:00 PM IST
आगामी वर्षात चाहत्यांना सलमानकडून जबरदस्त 'ईदी' title=

मुंबई : दबंग खान सलमान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या 'राधे' (Radhe) चित्रपटात तो पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. 'वॉन्टेड' चित्रपटानंतर सलमान या नव्या चित्रपटासह दिग्दर्शक प्रभुदेवा यांच्यासोबत पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे.

बुधावारी सलमानच्या 'दबंग ३' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी मीडियाशी बोलताना त्याने याबाबतची माहिती दिली. २००३ साली आलेल्या 'तेरे नाम' चित्रपटात सलमानने राधे ही भूमिका साकारली होती.  त्यानंतर २००९ मध्ये आलेल्या 'वॉन्टेड' चित्रपटातही राधे नावाचा उल्लेख केला होता. पण आगामी वर्षात येणारा 'राधे' चित्रपट अतिशय वेगळा असल्याचं सलमनाने सांगितलं. 

'राधे' येत्या वर्षात ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने सोशल मीडियावर चित्रपटाच्या तारखेची घोषणा केली होती. 

  

सोहेल खान 'राधे' चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर 'राधे'मधून सलमान आणि प्रभु देवा तिसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. प्रभुदेवा यांनी सलमानच्या 'वॉन्टेड' आणि आगामी 'दबंग ३' चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं आहे.