एकीकडे 'टायगर 3' प्रदर्शनाचा आनंद असताना सलमान खानला वाटते 'या' गोष्टीची भीती, पोस्ट शेअर करत म्हणाला...

Salman Khan Post before movie released : सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार असून अभिनेत्यानं त्या आधीच पोस्ट शेअर करत भीती व्यक्त केली. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 11, 2023, 12:32 PM IST
एकीकडे 'टायगर 3' प्रदर्शनाचा आनंद असताना सलमान खानला वाटते 'या' गोष्टीची भीती, पोस्ट शेअर करत  म्हणाला... title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan Post before movie released : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा सध्या त्याच्या 'टायगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत. त्याचा हा चित्रपट उद्या दिवाळीच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. त्याची आगाऊ बूकिंग देखील जोरदार सुरु आहेत. अशात आता सलमान खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला वाटत असलेली भीती सगळ्यांसोबत शेअर केली आहे. चला तर जाणून घेऊया सलमानला कसली भीती वाटते. 

सलमाननं त्याच्या एक्स अकाऊंटवरून म्हणजे आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही भीती व्यक्त केली आहे. "आम्ही खूप मेहनतीनं आणि प्रेमानं 'टायगर 3' बनवला आहे आणि त्यामुळे आम्ही चित्रपटातील स्पॉइलर्स कोणाला ही देऊ नका अशी विनंती करतोय. इतकंच नाही तर आम्ही तुमच्यावर यासाठी अवलंबून आहोत. स्पॉइलर्समुळे चित्रपट पाहण्याची इच्छा निघून जाते ती मज्जा राहत नाही. आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे की काय योग्य आहे. आम्हाला आशा आहे की टायगर 3 आमच्याकडून तुमच्यासाठी योग्य अशी दिवाळी भेट असेल. उद्या थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय, हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषेत", अशा आशयाची पोस्ट सलमाननं केली आहे. 

सलमान खानच्या 'टायगर 3' चं दिग्दर्शन हे मनीष शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात महतत्त्वाच्या भूमिकेत सलमान खान आणि कतरिना कैफ दिसणार आहेत. तर चित्रपटात इमरान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. स्पाय युनिव्हर्समधील सलमान खानचा हा तिसरा चित्रपट आहे. लक्ष्मी पूजनच्या निमित्तानं प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप आशा आहेत. त्याचं आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे सलमानसोबत या चित्रपट शाहरुख खान देखील दिसणार आहे. शाहरुख खान या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

हेही वाचा : 'भाभी' मालिका फेम प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कॅन्सर, सोशल मीडियावर बाल्ड लूक शेअर करत सांगितला प्रवास

दरम्यान, चित्रपटाची आगाऊ बूकिंग पाहता हा चित्रपट 'पठाण' आणि 'जवान'चा देखील रेकॉर्ड मोडेल अशी आशा सलमान खानच्या चाहत्यांना लागली आहे. तर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं या चित्रपटाला U/A सर्टिफिकेट दिलं आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांना या चित्रपटात RAW या शब्दा ऐवजी R&AW चा वापर करण्यास सांगितले आहे.