'इतकी' होती सलमानची पहिली कमाई !

आपल्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास अनेकांना रस असतो.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 27, 2017, 08:17 PM IST
'इतकी' होती सलमानची पहिली कमाई ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : आपल्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास अनेकांना रस असतो. त्याचं वैक्तिगत आयुष्य कसं असेल, ते कसे जगत असतील, त्यांना एका प्रोजेक्टसाठी किती पैसे मिळत असतील, असे प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडत असतात. आपल्या नटखट अंदाजाने सलमान अनेक तरुण तरुणींच्या मनावर राज्य करतो. बॉलिवूडचा दबंग खान आता कोट्यवधी रुपये कमवत असला तरी त्याची पहिली कमाई किती होती, माहिती आहे का ?

आपल्या पहिल्या कमाईचा खुलासा खुद्द सलमाननेच एका कार्यक्रमादरम्यान केला. सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत विराजमान झालेल्या ‘दबंग खान’च्या पहिल्या पगाराचा आकडा तुम्हालाही थक्क करेल. 

सलमान म्हणाला, "माझ्या आठवणीनुसार माझी पहिली कमाई होती फक्त पंच्याहत्तर रुपये. ताज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये मी नाचलो होतो. त्या कार्यक्रमात माझा एक मित्र नाचणार होता आणि मजा म्हणून त्याने मला तिथे नेलं." पंच्याहत्तर रुपयांपासून सुरुवात करणारा सलमान आता एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेतो. 

याचविषयी सांगताना सलमान म्हणाला, "पंच्याहत्तर रुपयांचा आकडा कालांतराने ७५० रुपयांवर पोहोचला जेव्हा मी ‘कॅम्पा कोला’ या कोल्ड ड्रींकची जाहिरात केली होती. त्यानंतर हा आकडा दीड हजारांवर पोहोचला. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटासाठी मला ३१,००० रुपये मिळाले होते. त्यानंतर तोही आकडा वाढून ७५,००० वर पोहोचला."

सलमानच्या या प्रगतीपथाकडे बघताना एक गोष्ट तर नक्कीच जाणवते की, आयुष्यात कष्ट, मेहनत आणि प्रतिक्षा याशिवाय यश मिळत नाही.