Salman Khan on Shah Rukh Khan Jawaan: 'जवान' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे त्यामुळे शाहरूख खानच्या या चित्रपटावर त्याचे प्रेक्षक हे कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे. यावर्षी आलेल्या 'पठाण' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विश्वविक्रम रचला आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटानं त्याच्या पुढील चित्रपटाची प्रेक्षकांना कोण उत्सुकता लागून राहिली होती. आता त्याच्या नव्या 'जवान' चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. काही दिवसांपुर्वीच याचा प्रिव्हयू प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. तुम्हाला माहितीये का यावर सलमान खाननंही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तो म्हणाला की, मी हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वसामान्यांप्रमाणे टिकीट काढून फर्स्ट डे फर्स्ट शोला जाणार आहे. त्यामुळे त्याच्या या व्यक्तव्यानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.
यावेळी सलमान खाननं आपल्या इन्टाग्राममधून एक पोस्ट शेअर केली ज्यात त्यानं याविषयी खुलासा केला आहे. त्यानं यावेळी लिहिलं आहे की, पठाण जवान झाला आहे. खूप सुंदर ट्रेलर आहे. मला फार आवडला आहे. ही अशी एक फिल्म आहे जी आपण सर्वांनी चित्रपटगृहात पाहायला हवी आहे. मी तर नक्कीच हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी जाणार आहे. मज्जा आली वाह! सध्या त्याच्या या प्रतिक्रियेनंतर शाहरूख खान आणि सलमान खानच यांच्या फॅन्सनी अप्रतिम अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यामुळे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. सलमाननं खासकरून शाहरूखसाठी ही पोस्ट लिहिली आहे तेव्हा या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
हेही वाचा - ''अरे, तुम्ही मैत्रीणी कधी झालात?'' दोन लोकप्रिय अभिनेत्री एकत्र ट्रेकिंगला गेल्यावर नेटकऱ्यांचा सवाल
'जवान' या चित्रपटातून दीपिका पादूकोण, नयनतारा, विजय सेतुपती दिसणार आहेत. सध्या या प्रीव्हयू प्रेक्षकांचे मनं जिंकून घेतले आहे. त्यामुळे या टीझरची सर्वत्र चर्चा आहे. तुम्ही हा प्रीव्हयू पाहून याच्या नक्कीच प्रेमात पडाल. सध्या या चित्रपटातील शाहरूखचा लुकही गाजतो आहे. त्यातून यावेळी तो ब्लॅड दिसत असल्यानं काहींनी त्यांची चेष्टा केली आहे तर त्याच्या डाय हार्ट फॅन्सनी त्याचे कौतुक केले आहे.
सलमान खानही लवकरच आपल्या टायगर 3 या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे त्याचीही सोशल मीडियावर चर्चा आहे. त्याचा सिनेमाही कधी एकदा प्रेक्षकागृहात येतो आहे याची उत्सुकता आहे.