'सलमान फुटपाथवर गाडी चालवत होता आणि तेव्हा...', कोणत्या अभिनेत्यानं सांगितला 1998 चा किस्सा

Salman Khan : या अभिनेत्यानं सलमान खानच्या रॅश ड्रायव्हिंग विषयी केला खुलासा... 

दिक्षा पाटील | Updated: Oct 18, 2024, 11:44 AM IST
'सलमान फुटपाथवर गाडी चालवत होता आणि तेव्हा...', कोणत्या अभिनेत्यानं सांगितला 1998 चा किस्सा title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. चित्रपटसृष्टीत त्याचे अनेक मित्र आहेत. त्याच्यासोबतच्या मैत्रिचे किस्से अनेक सेलिब्रिटी हे सांगताना दिसतात. आता बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा मित्र आसिफ शेखनं अभिनेत्याविषयीचा एक किस्सा सांगितला आहे. त्यानं सांगितलं की कशा प्रकारे एकदा तो सलमान खानसोबत एका गाडीतून जात होता आणि त्यावेळी सलमान रॅश ड्रायव्हिंग करत होता. इतकंच नाही तर त्यानंतर त्यांना एका पोलिसवाल्यानं थांबवल्याचे एका मुलाखतीत देखील सांगितले. 

'द लल्लनटॉप'सोबत चर्चा करत असताना आसिफ शेखनं सांगितलं की '1998 मध्ये जेव्हा ते 'बंधन' या चित्रपटाचं शूटिंग करत होते. त्यावेळी सलमानकडे एस्टीम गाडी होती. त्यावेळी आम्ही तरुण होतो आणि सलमानकडे गाडी असायची. त्यानं मला त्याच्या शेजारच्या अर्थात डायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसवलं आणि गाडी चालवू लागला. तो फुटपाथ वर, रस्त्यावर सगळीकडे गाडी चालवत होता. मी म्हणालो सलमान, आपल्या पकडतील अर्थात अटक होईल. त्यावर सलमान म्हणाला, पकडलं तर सलमान खान आहे. घाबरवू नकोस.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आसिफनं पुढे सांगितलं की त्यानंतर लगेच एक ट्रॅफिक पोलिसानं आमच्या गाडीला अडवलं. आसिफनं सांगितलं की त्यानं गाडीची काच खाली केली आणि ट्रॅफिक पोलिसानं त्याला ओळखलं नाही. याविषयी सांगत आसिफ पुढे म्हणाला, हे पाहून सलमाननं आसिफकडे पाहिलं आणि सांगितलं की त्यानं तर ओळखलंच नाही. तेव्हा आसिफनं मस्करीत सलमान खानला म्हटलं की 'शर्ट काढ, ओळखलं तर ओळखलं.'

आसिफच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यानं मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानं 'बंधन', 'परदेसी बाबू', 'प्यार किया तो डरना क्या', 'हसीना मान जाएगी', 'मैनें दिल तुझको दिया' आणि 'किसी का भाई किसी की जान' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर 'हम लोग', 'जी हॉरर', 'चंद्रकांता', 'येस बॉस', 'दिल मिल गए', 'चिडिया घर' आणि 'भाभी जी घर पर हैं' सारख्या अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.