सलमान खान महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...; चर्चांना उधाण

Salman Khan in Mahabaleshwar : सलमान खाननं महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...

दिक्षा पाटील | Updated: Jun 21, 2024, 04:16 PM IST
सलमान खान महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...; चर्चांना उधाण title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan in Mahabaleshwar : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गुरुवारी संध्याकाळी साताऱ्या जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये पोहोचला. खूप धुकं आणि पाऊस  अशा काही वातावरणाता त्यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरु होणार आहे. हो तुम्ही बरोबर वाचलं की सलमान त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिथे पोहोचला आहे. महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर सलमान हा डिएचएफएल घोटाळ्यात आरोपी आणि सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या वाधवानच्या बंगल्यात थांबला आहे. सलमान त्याच वाधवानच्या बंगल्यात थांबल्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.  कारण राहण्यासाठी सलमाननं तोच बंगला का निवडला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. 

दरम्यान, सलमानला धमकी मिळाल्यामुळे त्याला खास पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. पोलिसांचा ताफासोबत सलमान सगळीकडे जाताना दिसतो. सातारा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गाव आहे. त्यामुळे महाबळेश्वरला असल्यानं तो त्यांच्या गावी देखील जाणार होता पण दाट धुक्यामुळे तो जाऊ शकला नाही.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आता जर वाधवान यांच्याविषयी बोलायचे झाले तर ते कोरोना काळात वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. वाधवन यांनी 17 बॅंकांचे 34 हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर वाधवान बंधूंना सीबीआयने अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्याच बंगल्यात सलमान रहायला असल्यानं सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. सलमान खान हा महाबळेश्वरातील वाधवानच्या बंगल्यात रात्री वास्तव्यास आहे.कोरोनाच्या काळात वाधवान बंधूंची रिअल इस्टेट असलेला ‘दिवाण व्हिला’ बंगला महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेपासून 1 किमी अंतरावर आहे. ‘दिवाण व्हिला’ हा वाधवान कुटुंबाच्या मालकीचा आलिशान बंगला आहे. तर सलमान तिथेच राहत असून त्या बंगल्याचे गेट हे बंद आहेत. इतकंच नाही तर त्याशिवाय गेट बंद असला तरी आतमध्ये पोलिसांचा ताफा असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा : पहिल्यांदाच दोन घटस्फोटांबाबत अखेर बिपाशाच्या पतीनं सोडलं मौन...

दरम्यान, सलमान खानविषयी बोलायचं झालं तर तो कोणत्या हॉटेल, बंगला किंवा रिसॉर्टमध्ये चित्रीकरण सुरु आहे याविषयी कोणालाही काही माहिती नाही. त्याशिवाय तो अजून किती दिवस त्या बंगल्यात किंवा महाबळेश्वरला आहे याची देखील माहिती मिळालेली नाही. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x